post office saving account penalty reduced for non maintenance of minimum balance | पोस्टाच्या खातेदारांना मोठा दिलासा; दंडाची रक्कम निम्म्याने कमी

पोस्टाच्या खातेदारांना मोठा दिलासा; दंडाची रक्कम निम्म्याने कमी

ठळक मुद्देपोस्टाच्या लाखो बचतधारकांना दिलासा२०१९ च्या नियमावलीत सुधारणा ...तर खाते स्वयंचलित पद्धतीने बंद होणार

नवी दिल्ली: काही वर्षांपूर्वी भारतीय टपाल खात्यालाही बँकिंग व्यवहारांसाठी मान्यता देण्यात आली होती. यानंतर लाखो देशवासीयांना याचा लाभ घेत पोस्ट खात्यात (India Post) खाती सुरू केली. मात्र, बँकांप्रमाणेच टपाल खात्यातील बचत खात्यात दरमहा किमान शिल्लक ठेवणे आवश्यक असते. किमान शिल्लक कमी (minimum balance) असल्यास त्यावर दंड आकारला जातो. यामध्ये केंद्र सरकारने महत्वाची सुधारणा केली असून, यामुळे पोस्टाच्या लाखो बचतधारकांना दिलासा मिळाला आहे. (post office saving account penalty reduced for non maintenance of minimum balance)

पोस्टातील बचत खात्यावरील किमान शिलकीच्या नियमात केंद्र सरकारने महत्वाची सुधारणा केली आहे. पोस्टाच्या बचत खात्यात किमान शिल्लक नसल्यास लागू होणारी दंडाची रक्कम निम्म्याने कमी करण्याचा निर्णय अर्थ खात्याने घेतला आहे. याचा फायदा लाखो खातेदारांना होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

गुड न्यूज! अदानींकडून मोठी गुंतवणूक; ४८ हजार नोकऱ्या उपलब्ध होणार

२०१९ च्या नियमावलीत सुधारणा 

पोस्ट ऑफिस बचत खाते योजना २०१९ च्या नियमावलीत सुधारणा करण्यात आली आहे. अर्थ खात्याने यासंदर्भात ९ एप्रिल रोजी अध्यादेश काढला आहे. यानुसार, बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम नसल्यास आकारले जाणारे दंडात्मक शुल्क १०० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आले आहे.  किमान शिल्लक रक्कम ठेवण्याची अट तीन वर्षांहून अधिककाळ वापर न केल्यास खात्याना लागू आहे.

खाते स्वयंचलित पद्धतीने बंद होणार

शुल्क वजा होत राहिले आणि किमान रक्कम खात्यात जमा केली नाही तर खात्यातील शिल्लक शून्य होईल आणि खाते स्वयंचलित पद्धतीने बंद होणार आहे. तसेच किमान शिल्लक खात्यात नसेल, तर त्या खात्यावर व्याजही दिले जात नाही. त्यामुळे बचत खातेधारकांना किमान शिल्लक ठेवण्याबाबत सावध असणे आवश्यक आहे. 

LIC कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! २० टक्के पगारवाढ होणार; केंद्राचा लवकरच निर्णय

दरम्यान, पोस्टाच्या बचत खात्याच्या नियमावलीनुसार बचत खात्यात किमान ५०० रुपयांची शिल्लक आवश्यक आहे. जर खात्यातील शिल्लक त्याखाली गेली आणि आर्थिक वर्षाअखेर ती पूर्ण केली नाही तर त्या खात्यावर दंडात्मक शुल्क आकारले जाते. यापूर्वी १०० रुपये खात्यातून दंडात्मक शुल्क म्हणून वजा केले जात होते. मात्र आता ही रक्कम ५० रुपये करण्यात आली आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: post office saving account penalty reduced for non maintenance of minimum balance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.