Lokmat Money > बिझनेस न्यूज > Petrol Diesel Price: पाच राज्यांच्या निवडणुका संपताच पेट्रोल, डिझेल दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price: पाच राज्यांच्या निवडणुका संपताच पेट्रोल, डिझेल दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price hike today after 18 days pause: पेट्रोल डिझेलच्या किंमतीत ही वाढ जवळपास दोन महिन्यांनी झाली आहे. या आआधी 27 फेब्रुवारीला पेट्रोलच्या दरात 24 पैसे तर डिझेलच्या दरात 17 पैशांची वाढ झाली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 07:41 AM2021-05-04T07:41:42+5:302021-05-04T07:42:31+5:30

Petrol Diesel Price hike today after 18 days pause: पेट्रोल डिझेलच्या किंमतीत ही वाढ जवळपास दोन महिन्यांनी झाली आहे. या आआधी 27 फेब्रुवारीला पेट्रोलच्या दरात 24 पैसे तर डिझेलच्या दरात 17 पैशांची वाढ झाली होती.

Petrol, Diesel Prices Today, May 04, 2021: Rise in petrol and diesel prices after the five state elections ends | Petrol Diesel Price: पाच राज्यांच्या निवडणुका संपताच पेट्रोल, डिझेल दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price: पाच राज्यांच्या निवडणुका संपताच पेट्रोल, डिझेल दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price today: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पाच राज्यांच्या निवडणुका पार (Election Result)  पडल्या. याचबरोबर उत्तर प्रदेशमध्ये मिनी विधानसभा समजली जाणारी ग्राम पंचायत निवडणूक  (Panchayat Election in UP)  झाली. या निवडणुकांच्या निकालानंतर लगेचच सरकारी कंपन्यांनी (Oil PSUs)  इंधनाच्या दरांत वाढ (Petrol Diesel Price) करण्यात आली आहे. (petrol price hike by 15 paisa, diesel price hike by 18 paisa per liter in delhi.)


पेट्रोलडिझेलच्या किंमतीत ही वाढ जवळपास दोन महिन्यांनी झाली आहे. या आआधी 27 फेब्रुवारीला पेट्रोलच्या दरात 24 पैसे तर डिझेलच्या दरात 17 पैशांची वाढ झाली होती. आता दोन महिन्यांनी पुन्हा पेट्रोलच्या किंमतीत दिल्लीमध्ये 15 पैसे आणि डिझेलच्या किंमतीत 18 पैसे प्रती लीटर वाढ झाली आहे. मंगळवारी दिल्लीच्या बाजारात पेट्रोलचा दर 90.55 रुपये तर डिझेलचा दर 80.91 रुपये झाला होता. 


देशात निवडणुकांचा काळ असल्याने गेल्या 66 दिवसांत कच्चे तेल महागले तरीही पेट्रोल, डिझेलच्या दरांत (Petrol-Diesel Price) वाढ झाली नव्हती. मात्र, याच काळात कच्च्या तेलाच्या किंमती जेव्हा जेव्हा कोसळल्या तेव्हा चारवेळा पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्यात आले होते. यामुळे पेट्रोल 77 पैशांनी स्वस्त झाले होते. 
कच्च्या तेलाच्या किंमतीत गेल्या आठवड्यात मोठी वाढ पहायला मिळाली. यामुळे कच्चे तेल गेल्या सहा आठवड्यांच्या किमतीपेक्षा जास्त वाढले होते. मात्र, शेवटच्या दिवशी डॉलर मजबूत होणे आणि ओपेक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविण्याची घोषणा केल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत घट दिसून आली. 

पेट्रोल-डिझेलचा खप 118 कोटी टनांनी घटला; उद्योग, पर्यटन, कॅब वाहतूक घटल्याने फटका

टाळेबंदीमुळे मालवाहतूक, पर्यटन, कॅब वाहतूक याला मोठा फटका बसला. त्यामुळे गेल्या वर्षभरात डिझेलची मागणी १२ आणि पेट्रोलची मागणी सात टक्क्यांनी घटली आहे. डिझेलची मागणी ९८ लाख ३३ हजार आणि पेट्रोलची मागणी २० लाख २४ हजार टनांनी घटली आहे. म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत आर्थिक वर्षात  १ कोटी १८ लाख ५७ हजार टनांनी घट झाली आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाच्या वार्षिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे. इंधनाच्या मागणीत प्रथमच इतकी घट झाली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च २०२० मध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली. जवळपास दीड महिना देशातील व्यवहार ठप्प होते. विविध राज्यांनी जिल्हाबंदी अथवा जिल्हा अंतर्गत प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले होते.

Web Title: Petrol, Diesel Prices Today, May 04, 2021: Rise in petrol and diesel prices after the five state elections ends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.