lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > दोन महिन्यांत कांदा पुरवठ्यात तब्बल ६० लाख क्विंटलची घट

दोन महिन्यांत कांदा पुरवठ्यात तब्बल ६० लाख क्विंटलची घट

दक्षिणेकडील खरिपाचा कांदा सप्टेंबरमध्येच संपला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 05:50 AM2019-12-06T05:50:58+5:302019-12-06T05:55:01+5:30

दक्षिणेकडील खरिपाचा कांदा सप्टेंबरमध्येच संपला आहे.

Onion supply shrinks by 3 lakh quintals in two months | दोन महिन्यांत कांदा पुरवठ्यात तब्बल ६० लाख क्विंटलची घट

दोन महिन्यांत कांदा पुरवठ्यात तब्बल ६० लाख क्विंटलची घट

- योगेश बिडवर्ई

मुंबई : कांद्याचे दर रोज नवनवे विक्रम करत आहे. राज्यातील सहा मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा आढावा घेतला असता, यंदा आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये दरवर्षीच्या तुलनेत निम्मीच आवक झाली. राज्यातील १00 बाजार समित्यांमध्ये दोन महिन्यांत ६० लाख क्विंटलपेक्षा अधिक घट झाल्याने कांद्याच्या भावाने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत.
प्रमुख सहा बाजार समित्यांमध्ये आॅक्टोबरमध्ये सुमारे साडेआठ लाख तर नोव्हेंबरमध्ये तब्बल १० लाख क्विंटल आवक कमी झाल्याची माहिती ‘लोकमत’ला महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून मिळाली आहे. दक्षिणेकडील खरिपाचा कांदा सप्टेंबरमध्येच संपला आहे.
आॅक्टोबरनंतर तीन महिने महाराष्ट्रातूनच कांदा बाजारात येतो. त्यातही कांद्याचे आगार समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यावर देशाची भिस्त असते. मात्र यंदा नाशिक जिल्ह्यात अवकाळीने ७५ टक्के पीक उद्ध्वस्त झाले. सोलापूर जिल्ह्यातही दरवर्षीच्या तुलनेत आवक कमीच आहे. राज्यातील प्रमुख सहा बाजार समित्यांमध्ये आॅक्टोबरमधील तूट ८ लाख ४१ हजार २२३ लाख क्विंटल तर नोव्हेंबरमधील तूट ९ लाख ८६ हजार ८३१ क्विंटल आहे.

एक माणूस महिन्याला किती कांदा खातो?
भारतीय अन्न मंत्रालयाच्या माहितीनुसार एक माणूस महिन्याला एक किलो कांदा खातो.

दररोज किती मेट्रिक टन कांदा लागतो?
50000
भारत
3000
महाराष्टÑ
600
मुंबई

प्रमुख बाजार समित्यांमधील
आॅक्टोबर-नोव्हेंबरची आवक (आकडेवारी क्विंटलमध्ये)
बाजार समिती २०१८-१९ २०१९-२० लासलगाव ४0२६४७ ११७७२९
पिंपळगाव ६0९९१५ २३३६९५
सोलापूर ९,६९,७७५ २७६९२१
अहमदनगर ४,२0,३४८ १५७१२८
पुणे ५,४७,0७६ ४,८५,६९२
मुंबई ६२६१५४ ५४८८00

आॅक्टोबरपासून तीन महिने महाराष्ट्रातील कांद्यावरच देशाची भिस्त असते. कारण दक्षिणेतील कांदा सप्टेंबरपर्यंत संपतो. राज्यात ३५-४0% पीक नाशिक जिल्ह्यात होते. ते यंदा खूपच कमी असल्याने गणित कोलमडले आहे.
- नानासाहेब पाटील, संचालक, नाफेड

Web Title: Onion supply shrinks by 3 lakh quintals in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.