Lokmat Money > बिझनेस न्यूज > जुनी कर व्यवस्था निवडताय? सावधान! ITR भरताना 'या' चुका केल्यास थेट तुरुंगवास आणि २००% दंड!

जुनी कर व्यवस्था निवडताय? सावधान! ITR भरताना 'या' चुका केल्यास थेट तुरुंगवास आणि २००% दंड!

ITR Fine : या बदलांमुळे ITR भरताना अधिक पारदर्शकता येईल, पण करदात्यांना अधिक सावधगिरी बाळगावी लागेल. जेणेकरून कोणत्याही दंडापासून किंवा कायदेशीर अडचणींपासून तुम्ही वाचू शकाल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 15:11 IST2025-06-05T15:07:14+5:302025-06-05T15:11:31+5:30

ITR Fine : या बदलांमुळे ITR भरताना अधिक पारदर्शकता येईल, पण करदात्यांना अधिक सावधगिरी बाळगावी लागेल. जेणेकरून कोणत्याही दंडापासून किंवा कायदेशीर अडचणींपासून तुम्ही वाचू शकाल.

Old Tax Regime ITR Filing New Strict Rules Could Lead to 200% Penalty & Jail | जुनी कर व्यवस्था निवडताय? सावधान! ITR भरताना 'या' चुका केल्यास थेट तुरुंगवास आणि २००% दंड!

जुनी कर व्यवस्था निवडताय? सावधान! ITR भरताना 'या' चुका केल्यास थेट तुरुंगवास आणि २००% दंड!

ITR Fine : देशातील कोट्यवधी करदात्यांसाठी एक महत्त्वाची सूचना! सध्या तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी जुनी कर व्यवस्था आणि नवीन कर व्यवस्था असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. पण, आता जुनी कर प्रणाली निवडणाऱ्यांसाठी ITR भरणं थोडं अधिक कठीण होऊ शकतं. कारण, प्राप्तीकर विभागाने जुन्या कर प्रणाली अंतर्गत कर भरण्याशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल केला आहे.

जर तुम्ही ITR फाइल करताना छोटीशीही चूक केली, तर तुम्हाला तब्बल २०० टक्के दंड भरावा लागू शकतो, आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये तुरुंगवास देखील होऊ शकतो! त्यामुळे, आता ITR भरताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

नेमके कोणते बदल झाले आहेत?
जुन्या कर प्रणाली अंतर्गत ITR दाखल करू इच्छिणाऱ्या लोकांना आता विविध कर सवलतींचा लाभ घेण्यासाठी अधिक तपशील आणि कागदपत्रे सादर करावी लागतील. आयकर विभागाने विशेषतः कलम 80C, 80D, घरभाडे भत्ता (HRA), 80EE, 80EEB यासारख्या महत्त्वाच्या कलमांमध्ये हे बदल केले आहेत.

प्रत्येक कलमासाठी काय नवीन माहिती द्यावी लागेल?
कलम ८०सी

जर तुम्हाला पीपीएफ, ईपीएफ, एनएससी, जीवन विमा किंवा इतर गुंतवणुकीवर कर बचत मिळवायची असेल, तर आता तुम्हाला पावती क्रमांक, पॉलिसी आयडी, खाते तपशील आणि पेमेंट करणाऱ्या व्यक्तीचे नाव यासारखे अधिक तपशील द्यावे लागतील.

कलम ८०डी
आरोग्य विमा प्रीमियमवर कर कपातीचा दावा करायचा असल्यास, तुम्हाला विमा घेणाऱ्या व्यक्तीचे नाव, पॉलिसी क्रमांक किंवा पावती क्रमांकाचा पुरावा द्यावा लागेल.
जर तुम्ही तुमच्यासाठी सोडून दुसऱ्या कोणासाठी विमा घेतला असेल, तर त्यांच्याशी तुमचे काय नाते आहे हे देखील सांगावे लागेल.

घरभाडे भत्ता (HRA) कलम १० (१३अ)
जर तुम्ही भाडे भरण्यासाठी कर सवलतीचा दावा करत असाल, तर तुम्हाला तुम्ही कुठे काम करता, कोणत्या तारखेला HRA मिळाला आणि किती भाडे दिले जात आहे याची माहिती द्यावी लागेल.
जर तुम्ही वर्षाला १ लाखांपेक्षा जास्त भाडे देत असाल, तर भाडे पावतीसोबत घरमालकाचे नाव आणि पॅन क्रमांक देणे बंधनकारक असेल.

कलम ८०ई/८०ईईबी
शिक्षण कर्ज किंवा गृहकर्जाच्या व्याजावर कर बचतीचा दावा करत असाल, तर तुम्हाला कर्ज खाते क्रमांक, व्याज भरण्याचे प्रमाणपत्र आणि वित्तीय संस्थेचे नाव द्यावे लागेल. ज्या व्यक्तीसाठी कर्ज घेतले आहे, त्यांचे नावही सांगावे लागेल.

वाचा - बकरी ईद आणि शनिवारमुळे 'या' शहरांमध्ये बँका बंद! तुमचा जिल्हा यात आहे का?

आता प्रत्येक कर दाव्याची AIS (Annual Information Statement) प्रणालीद्वारे स्वयंचलित तपासणी केली जात आहे. त्यामुळे, ITR दाखल करताना तुम्ही दिलेली माहिती तुमच्या कागदपत्रांशी आणि उपलब्ध सरकारी डेटाशी जुळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या बदलांमुळे ITR भरताना अधिक पारदर्शकता येईल, पण करदात्यांना अधिक सावधगिरी बाळगावी लागेल. त्यामुळे, तुमचा ITR दाखल करण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा आणि माहिती अचूक असल्याची खात्री करा, जेणेकरून कोणत्याही दंडापासून किंवा कायदेशीर अडचणींपासून तुम्ही वाचू शकाल!
 

Web Title: Old Tax Regime ITR Filing New Strict Rules Could Lead to 200% Penalty & Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.