राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म रॅपिडो (Rapido) आता लोकांना बाइक बुक करण्याबरोबरच जेवण ऑर्डर करण्याचाही पर्याय देणार आहे. यासाठी रॅपिडोनं ओनली नावाचे नवे अॅप लाँच केले आहे. ओनली (Ownly) अॅपच्या माध्यमातून आता लोक घरबसल्या जेवण मागवू शकतात. रॅपिडोप्रमाणेच हे अॅप लोकांना आवडलं तर ते झोमॅटो आणि स्विगीला मोठी टक्कर देऊ शकते. आता रॅपिडोचं ओनली अॅप लोकांना कितपत आवडतं हे पाहावं लागेल.
अॅपवरून स्वस्तात मिळणार जेवण
रॅपिडोच्या फूड डिलिव्हरी अॅपच्या माध्यमातून लोक खूप स्वस्तात जेवण मागवू शकतात. या अॅपच्या माध्यमातून लोक चपाती, राईस यासारखे जेवण १५० रुपये किंवा त्यापेक्षा कमी किंमतीत मागवू शकतात. अशा तऱ्हेनं लोक ऑफलाइन किमतीत ऑनलाइन जेवण मागवू शकतात. ओनली अॅपचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे अॅप रेस्टॉरंटकडून कोणतंही कमिशन घेणार नाही, परंतु ओनली अॅप रेस्टॉरंटकडून प्रति ऑर्डर शुल्क आकारणार आहे.
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
फूड डिलिव्हरी फी किती?
रॅपिडोचं नवीन ओनली अॅप रेस्टॉरंटपासून ४ किमीच्या अंतरात फिक्स्ड डिलिव्हरी शुल्क आकारेल. त्याच वेळी, १०० ते ४०० रुपयांपर्यंतच्या ऑर्डरसाठी हे शुल्क २५ रुपये असेल आणि १०० रुपयांपेक्षा कमी ऑर्डरसाठी हे शुल्क २० रुपये असेल. याशिवाय, ४०० रुपयांपेक्षा जास्त ऑर्डरसाठी हे शुल्क ५० रुपये असेल. डिलिव्हरी शुल्काव्यतिरिक्त इतर शुल्कांबद्दल बोलायचं झाले तर, ओनली अॅप डिलिव्हरी शुल्काव्यतिरिक्त जीएसटीही आकारेल. सध्या रॅपिडोनं
आपलं अॅप फक्त बंगळुरूच्या काही भागातच लाँच केलं आहे. या भागात बायरसांद्रा, तावरेकेरे आणि मंडीवाला लेआउट, होसूर सर्जापुरा रोड लेआउट आणि कोरमंगला यांचा समावेश आहे.