Your Money, Your Right: तुम्हाला माहीत आहे का, की तुमच्या मेहनतीची दावा न केलेली कमाई बँक, विमा कंपन्या किंवा म्युच्युअल फंडात अनेक वर्षांपासून पडून असू शकते? कदाचित तुमचे किंवा तुमच्या कुटुंबाचे हजारो किंवा लाखो रुपये तुमच्या नावाने वाट पाहत असतील, पण फक्त तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले अलीकडील आवाहन हाच दडलेला खजिना लोकांपर्यंत परत पोहोचवण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल आहे.
पीएम मोदींनी लिंक्डइन पोस्टद्वारे माहिती दिली की, देशात सुमारे दावा न केलेले ७८,००० कोटी रुपये बँक खात्यांमध्ये १४ हजार कोटी रुपये विमा कंपन्यांमध्ये, ३००० कोटी रुपये म्युच्युअल फंडात आणि ९००० कोटी रुपये डिव्हिडंड म्हणून पडून आहेत. ही रक्कम त्या कोट्यवधी भारतीयांची आहे, ज्यांनी काही कारणांमुळे वेळेवर यावर दावा केला नाही.
Here is a chance to convert a forgotten financial asset into a new opportunity.
— Narendra Modi (@narendramodi) December 10, 2025
Take part in the ‘Your Money, Your Right’ movement! https://t.co/4Td6wyz99i@LinkedIn
पीएम मोदी म्हणाले की, लोकांची अडकलेली रक्कम परत मिळवून देण्यासाठी सरकारने ऑक्टोबर २०२५ मध्ये ‘तुमचा पैसा, तुमचा अधिकार’ (Your Money, Your Right) ही मोहीम सुरू केली. या मोहिमेचा उद्देश आहे की, प्रत्येक व्यक्तीला त्याची स्वतःची कमाई सहजपणे आणि योग्य पद्धतीनं परत मिळावी.
महत्त्वाची वेब पोर्टल्स
- आरबीआयचं UDGAM पोर्टल: दावा न केलेल्या बँक ठेवी तपासण्यासाठी.
- आयआरडीएआयचं Bima Bharosa पोर्टल: विम्याच्या पॉलिसींमध्ये अडकलेल्या रकमेसाठी.
- सेबीचं MITRA पोर्टल: म्युच्युअल फंडात पडून असलेल्या दावा न केलेल्या रकमेसाठी.
- एमसीएचे IEPFA पोर्टल: डिव्हिडंड आणि दावा न केलेल्या शेअर्ससाठी.
सरकारच्या माहितीनुसार, डिसेंबर २०२५ पर्यंत देशातील ४७७ जिल्ह्यांमध्ये सुविधा शिबिरं लावण्यात आली आहेत, ज्यात दूर पर्यंतच्या भागांपर्यंत पोहोचण्यावर विशेष जोर देण्यात आला आहे. या प्रयत्नांचा मोठा परिणाम दिसत आहे की, आतापर्यंत सुमारे २००० कोटी रुपये त्यांच्या मूळ मालकांना परत मिळाले आहेत.
पीएम मोदींचं जनतेला आवाहन
पीएम मोदींनी जनतेला आवाहन केलंय की, त्यांनी वेळ काढून या पोर्टल्सवर स्वतःची किंवा कुटुंबाची दावा न केलेली रक्कम तपासावी. अनेकदा जुनी बँक पासबुक, हरवलेली पॉलिसी, जुने शेअर्स किंवा जुन्या म्युच्युअल फंड योजनांमधील जमा रकमेचा अंदाज कोणाला नसतो आणि हाच पैसा तुमचं नशीब बदलू शकतो.
