Toll Plaza Digital: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय राष्ट्रीय महामार्गावरील (National Highway) टोल नाक्यांवर होणारे रोख व्यवहार पूर्णपणे बंद करण्याच्या विचारात आहे. मंत्रालयानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, राष्ट्रीय महामार्ग टोल प्रणाली पूर्णपणे डिजिटल करण्याच्या उद्देशानं, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) १ एप्रिल २०२६ पासून देशभरातील टोल नाक्यांवरील रोख व्यवहार बंद करू शकते. या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर, राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोलची रक्कम केवळ फास्टॅग (FASTag) किंवा यूपीआय (UPI) वापरून डिजिटल माध्यमातूनच स्वीकारले जातील.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
प्रवाशांचा प्रवास होणार अधिक सुखकर
इलेक्ट्रॉनिक टोल संकलनात झालेली प्रगती अधिक मजबूत करणे आणि टोल नाक्यांच्या कामकाजाची कार्यक्षमता व विश्वासार्हता वाढवणं हा या बदलाचा मुख्य उद्देश आहे. या बदलामुळे टोल लेनची कार्यक्षमता सुधारेल, ज्यामुळे टोल नाक्यांवरील गर्दी कमी होईल. तसंच, टोल व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता आणि स्थिरता आल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग युजर्ससाठी 'प्रवास अधिक सुकर' होण्यास मदत होईल, असं मंत्रालयानं स्पष्ट केलंय.
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹११,१११; व्हाल लखपती, किती मिळेल रिटर्न?
डिजिटल पेमेंटमुळे सुविधांमध्ये झाली वाढ
गेल्या काही वर्षांत फास्टॅगचा वापर ९८ टक्क्यांहून अधिक वाढल्यानं देशातील टोल वसुलीच्या पद्धतीत लक्षणीय बदल झाला आहे. सध्या टोल व्यवहारांचा मोठा हिस्सा वाहनांमध्ये बसवलेल्या आरएफआयडी-सक्षम फास्टॅगद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं पार पाडला जातो, ज्यामुळे टोल नाक्यांवर कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवास करणं शक्य झालंय. याव्यतिरिक्त, टोल नाक्यांवर यूपीआय पेमेंटची सुविधाही सुरू करण्यात आली आहे, ज्यामुळे देशभरातील प्रवाशांना त्वरित आणि सुलभ डिजिटल पेमेंटचा पर्याय उपलब्ध झालाय.
रोख पेमेंटमुळे उद्भवणारे वाद आणि गर्दी होणार कमी
टोल नाक्यांच्या स्तरावर केलेल्या मूल्यांकनातून असं दिसून आलंय की, रोख पेमेंटमुळे टोल नाक्यांवर गर्दी वाढते, व्यस्त वेळेत प्रवाशांना जास्त वेळ वाट पाहावी लागते आणि व्यवहारांवरून वाद निर्माण होतात. पूर्णपणे डिजिटल पेमेंट प्रणालीकडे वळल्यामुळे कामकाजाची कार्यक्षमता वाढेल, वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा होईल आणि विलंबाचा काळ कमी होईल. यामुळे देशभरातील विविध महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरील १,१५० हून अधिक टोल नाक्यांवर प्रवाशांचा एकूण अनुभव अधिक चांगला होईल.
