Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > UIDAI च्या नव्या App द्वारे काही मिनिटांत तुम्ही अपडेट करू शकता तुमचा पत्ता; पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर

UIDAI च्या नव्या App द्वारे काही मिनिटांत तुम्ही अपडेट करू शकता तुमचा पत्ता; पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर

UIDAI App Address Update: लोकांना आधार कार्डशी संबंधित येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी 'UIDAI' नं एक मोठं डिजिटल पाऊल उचललं आहे. आता नागरिकांना आपल्या घरचा पत्ता अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर जाण्याची किंवा लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 15:27 IST2026-02-09T15:27:08+5:302026-02-09T15:27:08+5:30

UIDAI App Address Update: लोकांना आधार कार्डशी संबंधित येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी 'UIDAI' नं एक मोठं डिजिटल पाऊल उचललं आहे. आता नागरिकांना आपल्या घरचा पत्ता अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर जाण्याची किंवा लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

You can update your address in a few minutes through UIDAI's new app; see step-by-step procedure | UIDAI च्या नव्या App द्वारे काही मिनिटांत तुम्ही अपडेट करू शकता तुमचा पत्ता; पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर

UIDAI च्या नव्या App द्वारे काही मिनिटांत तुम्ही अपडेट करू शकता तुमचा पत्ता; पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर

Aadhaar Card Address Update Online: लोकांना आधार कार्डशी संबंधित येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी 'UIDAI' नं एक मोठं डिजिटल पाऊल उचललं आहे. आता नागरिकांना आपल्या घरचा पत्ता अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर जाण्याची किंवा लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही. UIDAI च्या नवीन आधार मोबाईल ॲपद्वारे हे काम आता काही मिनिटांत स्मार्टफोनवरून पूर्ण करता येईल. ही सुविधा विशेषतः नोकरी, शिक्षण किंवा इतर कारणांमुळे वारंवार राहण्याचं ठिकाण बदलणाऱ्या लोकांसाठी मोठा दिलासा देणारी ठरली आहे.

कागदपत्रे किंवा कुटुंबातील सदस्याच्या आधारचा पर्याय

पत्ता अपडेट करण्यासाठी युजर्सकडे दोन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय म्हणजे, स्वतःच्या पत्त्याचा वैध पुरावा जसं की वीज बिल, बँक स्टेटमेंट किंवा इतर मान्यताप्राप्त कागदपत्रे अपलोड करणं. दुसरा पर्याय असा की, जर तुम्ही कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत त्याच पत्त्यावर राहत असाल, तर त्यांच्या आधार तपशिलाचा वापर करूनही पत्ता अपडेट केला जाऊ शकतो. कागदपत्रांचा स्पष्ट फोटो किंवा स्कॅन कॉपी अपलोड केल्यानंतर नवीन पत्ता भरावा लागतो.

पगाराच्या तुलनेत किती असावा होम लोनचा हप्ता? ४० टक्क्यांचा फॉर्म्युला ठरेल फायदेशीर

फेस ऑथेंटिकेशन आणि शुल्क

अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 'फेस ऑथेंटिकेशन' केलं जातं, ज्यामुळे सुरक्षितता आणि पारदर्शकता वाढते. त्यानंतर, सुमारे ७५ रुपये इतकं नाममात्र शुल्क भरून विनंती सबमिट केली जाते. UIDAI द्वारे माहितीची तपासणी केल्यानंतर, सामान्यतः काही दिवसांपासून ते दोन आठवड्यांच्या आत आधारमधील नवीन पत्ता अपडेट होतो.

मोबाईल ॲपद्वारे पत्ता अपडेट करण्याची प्रक्रिया

१. सर्वप्रथम Google Play Store किंवा App Store वरून अधिकृत 'आधार ॲप' डाउनलोड करा. 
२. ॲप उघडून आधार क्रमांक आणि आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे लॉगिन करा. 
३. सुरक्षेसाठी 'MPIN' सेट करा किंवा बायोमेट्रिक/फेस ऑथेंटिकेशनचा वापर करा. 
४. लॉगिन केल्यानंतर 'Services' विभागात जाऊन 'Address Update' हा पर्याय निवडा. 
५. तुम्हाला पत्ता कशा प्रकारे अपडेट करायचा आहे तो पर्याय निवडा. 
६. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि नवीन पत्ता भरा.
७. माहिती अचूक असल्याची खात्री करून अर्ज सबमिट करा.

Web Title : UIDAI ऐप से मिनटों में आधार पता अपडेट करें: चरण-दर-चरण गाइड।

Web Summary : UIDAI का नया ऐप आधार पता अपडेट को आसान बनाता है। कतार छोड़ें; दस्तावेज़ों या परिवार के सदस्य के विवरण का उपयोग करके स्मार्टफोन के माध्यम से अपडेट करें। फेस ऑथेंटिकेशन और मामूली शुल्क लागू होते हैं। प्रक्रिया में कुछ दिन से सप्ताह लगते हैं।

Web Title : Update Aadhaar address in minutes via UIDAI app: Step-by-step guide.

Web Summary : UIDAI's new app simplifies Aadhaar address updates. Skip queues; update via smartphone using documents or family member's details. Face authentication and a nominal fee apply. Process takes days to weeks.