lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता घरबसल्या EPFO ​​मध्ये नवीन बँक अकाउंट अपडेट करा, जाणून घ्या कसे?

आता घरबसल्या EPFO ​​मध्ये नवीन बँक अकाउंट अपडेट करा, जाणून घ्या कसे?

EPFO : तुमचे बँक डिटेल्स अपडेट केले पाहिजेत जेणेकरून पैशांच्या व्यवहारात कोणतीही अडचण येणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 01:03 PM2021-12-24T13:03:58+5:302021-12-24T13:05:41+5:30

EPFO : तुमचे बँक डिटेल्स अपडेट केले पाहिजेत जेणेकरून पैशांच्या व्यवहारात कोणतीही अडचण येणार नाही.

You Can Update Bank Details With EPFO Using UAN At Home, Check Full Process | आता घरबसल्या EPFO ​​मध्ये नवीन बँक अकाउंट अपडेट करा, जाणून घ्या कसे?

आता घरबसल्या EPFO ​​मध्ये नवीन बँक अकाउंट अपडेट करा, जाणून घ्या कसे?

नवी दिल्ली : तुम्ही नोकरी करत असाल तर तुमचा पीएफही (PF) कापला गेला पाहिजे. सेवानिवृत्तीसाठी पीएफची रक्कम (PF Amount) खूप महत्त्वाची मानली जाते, ही रक्कम तुम्हाला निवृत्तीच्या वेळी खूप मदत करू शकते. त्यामुळे पीएफ काढू नये असा सल्ला दिला जातो. दरम्यान, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये (EPFO) बँक डिटेल्सची मोठी भूमिका असते. 

तुमचे बँक डिटेल्स अपडेट केले पाहिजेत जेणेकरून पैशांच्या व्यवहारात कोणतीही अडचण येणार नाही. जर तुम्ही नोकरी बदलली असेल आणि बँक खाते अपडेट केले नसेल तर तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही घरबसल्या तुमच्या बँकेचे डिटेल्स अपडेट करू शकता. जर तुमचा जुना किंवा चुकीचा खाते क्रमांक EPFO ​​मध्ये दिला असेल, तर तुम्ही तुमचे नवीन बँक खाते UAN म्हणजेच युनिव्हर्सल अकाउंट नंबरद्वारे सहजपणे अपडेट करू शकता.

'ही' आहे प्रक्रिया...
- ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि तुमचे डिटेल टाकून लॉग इन करा.
- टॉप मेनूवरील 'Manage' टॅबवर क्लिक करा.
- ड्रॉप डाउन मेनूमधून 'KYC' पर्यायावर जा आणि डॉक्यूमेंट टाइपमध्ये 'Bank' निवडा.
- बँक खाते क्रमांक आणि IFSC कोडसह नवीन बँक तपशील प्रविष्ट करा.
- अपडेट बँक डिटेल्स अपलोड करण्यासाठी 'Save' वर क्लिक करा. नंतर तुमची विनंती KYC Pending for Approval म्हणून दिसून येईल.
- आता आवश्यक कागदपत्रे तुमच्या कंपनीकडे जमा करा.
- कंपनीकडून मंजूरी मिळाल्यानंतर, तुम्हाला केवायसी मंजुरीसाठी प्रलंबित असलेले डिजिटली मंजूर केवायसीमध्ये बदललेले दिसेल.

अशाप्रकारे चेक करा पीएफ बॅलन्स...
- EPFO ​​सदस्यांनी  www.epfindia.gov.in या वेबसाइटवर जावे.
- आता 'Our Services'  टॅबमधून 'For Employees' ऑप्शनवर क्लिक करा.
>> त्यानंतर 'Services' टॅबमधून 'Member Passbook' वर क्लिक करा.
>> यानंतर तुम्ही लॉग इन करण्यासाठी तुमचा UAN आणि पासवर्ड टाका. नंतर तुम्हाला तुमच्या PF खात्याचे पासबुक पाहता येईल.

ऑनलाइन प्रणालीची सुविधा
सध्या संपूर्ण व्यवस्था डिजिटल आणि ऑनलाइन होत आहे. त्यामुळे EPFO सुद्धा आपल्या सदस्यांसाठी ऑनलाइनच्या सुविधा देत आहेत. EPFO ने आपल्या सर्व सदस्यांना त्यांची माहिती अपडेट करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीची सुविधा दिली आहे. ज्या सदस्यांकडे UAN क्रमांक आहे, ते ऑनलाइन अपडेटचा लाभ घेऊ शकतात. 

UAN चे  मोठे फायदे
UAN चे अनेक फायदे आहेत. EPFO सदस्य या युनिक नंबरद्वारे पेन्शन फंडाचे डिटेल्स एकाच ठिकाणी पाहू शकतात, पीएफ खात्यातील सर्व व्यवहारांची माहिती मिळवू शकतात, EPFO मध्ये दिलेले बँक डिटेल्स देखील अपडेट करू शकतात. याचा अर्थ असा की EPFO ​​सदस्य सहजपणे बँकेचे डिटेल्स बदलू शकतात आणि हे काम घरी बसून ऑनलाइन होऊ शकते.

Read in English

Web Title: You Can Update Bank Details With EPFO Using UAN At Home, Check Full Process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.