Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > केवळ ₹५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; १५ वर्षांत बनवाल मोठा रिटायरमेंट फंड, जबरदस्त आहे सरकारी स्कीम

केवळ ₹५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; १५ वर्षांत बनवाल मोठा रिटायरमेंट फंड, जबरदस्त आहे सरकारी स्कीम

PPF Investment Scheme: जर तुम्हाला असा गुंतवणूक पर्याय हवा असेल ज्यात जोखीम नसेल आणि परतावा देखील चांगला हवा असेल, तर तुम्हाला या सरकारी स्कीममध्ये चांगला परतावा मिळू शकेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 11:24 IST2025-10-23T11:24:12+5:302025-10-23T11:24:12+5:30

PPF Investment Scheme: जर तुम्हाला असा गुंतवणूक पर्याय हवा असेल ज्यात जोखीम नसेल आणि परतावा देखील चांगला हवा असेल, तर तुम्हाला या सरकारी स्कीममध्ये चांगला परतावा मिळू शकेल.

You can start investing from just ₹500; You will create a big retirement fund in 15 years, this government scheme is amazing | केवळ ₹५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; १५ वर्षांत बनवाल मोठा रिटायरमेंट फंड, जबरदस्त आहे सरकारी स्कीम

केवळ ₹५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; १५ वर्षांत बनवाल मोठा रिटायरमेंट फंड, जबरदस्त आहे सरकारी स्कीम

PPF Investment Scheme: जर तुम्हाला असा गुंतवणूक पर्याय हवा असेल ज्यात जोखीम नसेल आणि परतावा देखील चांगला हवा असेल, तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) तुमच्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो. पीपीएफ ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी आणि देशातील सर्वात विश्वसनीय बचत योजनांपैकी एक आहे. ही योजना केवळ सुरक्षित नाही, तर कर बचतीची (Tax Savings) एक चांगली संधी देखील देते. तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेत पीपीएफ खातं उघडू शकता.

पीपीएफ ही एक दीर्घकालीन बचत योजना आहे. यामध्ये तुम्ही दरवर्षी किमान ५०० रुपये ते कमाल १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. याचा लॉक-इन कालावधी १५ वर्षांचा असतो, म्हणजेच या कालावधीनंतरच तुम्ही संपूर्ण रक्कम काढू शकता.

टाटा ट्रस्टमधील वाद थांबेनात! आता ट्रस्टी मेहली मिस्त्रींनी ठेवली नवी अट, काय होणार बदल?

व्याज दर आणि कर लाभ

सध्या पीपीएफवर वार्षिक ७.१% व्याज दिलं जात आहे, जे सरकारद्वारे दर तिमाहीत निश्चित केलं जातं. सर्वात खास गोष्ट म्हणजे, यावर मिळणारं व्याज पूर्णपणे करमुक्त असते. त्याचबरोबर, आयकर कलम ८०सी अंतर्गत गुंतवणुकीच्या रकमेवर कर सवलत देखील मिळते. यामुळे ही योजना ई-ई-ई श्रेणीतील आहे. याचा अर्थ, गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम या तिघांवरही कोणताही कर लागत नाही.

पैसा काढण्याची, कर्जाची सुविधा

पीपीएफमध्ये १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही संपूर्ण रक्कम काढू शकता. तथापि, ५ वर्षांनंतर अंशतः रक्कम काढण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त, गरज पडल्यास तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता. पीपीएफचा मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षांचा असला तरी, तो एकावेळी ५ वर्षांसाठी आणखी वाढवता येतो.

पीपीएफ सर्वोत्तम का आहे?

पीपीएफ उत्तम असण्याची मुख्य कारणं म्हणजे यात पूर्णपणे सरकारी हमी असल्यानं शून्य जोखीम असते, तसंच यात कर बचत आणि निश्चित परतावा यांचं चांगलं संयोजन मिळतं. निवृत्तीसाठी एक मजबूत निधी तयार करण्याचा हा एक सुरक्षित मार्ग आहे.

पीपीएफची ठळक वैशिष्ट्ये

किमान गुंतवणूकीची रक्कम ५०० रुपये वार्षिक आणि कमाल रक्कम १.५ लाख रुपये वार्षिक आहे. मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षे असून व्याज दर ७.१ % वार्षिक आहे. याला ८०सी अंतर्गत EEE स्टेटस मिळतो आणि कर्ज सुविधा देखील उपलब्ध आहे. बाजारात अनेक गुंतवणुकीचे पर्याय असले तरी, पीपीएफ आपल्या स्थिरता, सुरक्षा आणि कर फायद्यांमुळे आजही कोट्यवधी गुंतवणूकदारांची पसंती आहे. दीर्घकाळात सुरक्षित आणि विश्वासार्ह बचत करणाऱ्या लोकांसाठी ही एक आदर्श योजना आहे.

Web Title : ₹500 से निवेश शुरू करें, सरकारी योजना से रिटायरमेंट फंड बनाएं

Web Summary : पीपीएफ एक सुरक्षित, कर-बचत निवेश है जो गारंटीड रिटर्न प्रदान करता है। सालाना ₹500 से ₹1.5 लाख तक निवेश करें, 7.1% ब्याज अर्जित करें। यह ऋण और निकासी विकल्प प्रदान करता है, जो आपकी सेवानिवृत्ति को सुरक्षित करता है।

Web Title : Start Investing with ₹500, Build Retirement Fund with Government Scheme

Web Summary : PPF offers a secure, tax-saving investment with guaranteed returns. Invest ₹500 to ₹1.5 lakh annually, earning 7.1% interest. It provides loan and withdrawal options, securing your retirement.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.