LIC Scheme For Kids: प्रत्येक पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता असते. विशेषतः वाढती महागाई पाहता, प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी बचत करत आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणुकीच्या एखाद्या योजनेच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच LIC च्या एका अशा योजनेबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही तुमच्या मुलांसाठी गुंतवणूक करू शकता आणि उत्तम परतावा मिळवू शकता. या योजनेचं खास वैशिष्ट्य म्हणजे यात गुंतवणुकीसोबतच विम्याचा लाभही मिळतो.
काय आहे LIC अमृत बाल पॉलिसी?
आम्ही LIC च्या 'अमृत बाल पॉलिसी' (LIC Amrit Bal Policy) बद्दल बोलत आहोत. LIC ची अमृत बाल पॉलिसी ही एक नॉन-लिंक्ड विमा योजना आहे. या योजनेअंतर्गत पालक आपल्या मुलांसाठी मोठा निधी जमा करू शकतात. त्याचबरोबर या योजनेत विम्याचं संरक्षणही दिलं जातं. पालक आपल्या ३० दिवसांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी ही पॉलिसी घेऊ शकतात.
दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
तसंच, या योजनेत सहभागी होण्यासाठी मुलाचे जास्तीत जास्त वय १३ वर्षे असावं. या पॉलिसीमध्ये किमान २ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करणं आवश्यक आहे, तर कमाल गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. LIC ची अमृत बाल पॉलिसी किमान १८ वर्षे किंवा कमाल २५ वर्षांनंतर मॅच्युअर होते, ज्यानंतरच जमा झालेला निधी मिळतो.
गुंतवणुकीवर मिळणारा परतावा आणि प्रीमियम
LIC च्या अमृत बाल पॉलिसीमध्ये दरवर्षी प्रति हजार रुपयांवर ८० रुपयांचा परतावा मिळतो. या लाभासाठी पॉलिसी चालू असणं आवश्यक आहे. या योजनेत प्रीमियम भरण्यासाठी लवचिकता देण्यात आली आहे. लोक आपल्या सोयीनुसार मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर प्रीमियमचा भरणा करू शकतात. या पॉलिसीचा प्रीमियम हा मुलाचं वय आणि विम्याची रक्कम यांसारख्या अनेक गोष्टींवर अवलंबून असतो.
