lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Petrol Diesel Price : दीड वर्षात तब्बल ३६ रुपयांनी पेट्राेल महागले, डिझेलचे दरही २७ रुपयांनी वाढले

Petrol Diesel Price : दीड वर्षात तब्बल ३६ रुपयांनी पेट्राेल महागले, डिझेलचे दरही २७ रुपयांनी वाढले

Petrol Diesel Price : सद्य:स्थितीत देशातील सर्व राज्यांमध्ये पेट्राेलने शंभरी गाठली असून, प्रमुख शहरांमध्ये डिझेलचा दरही १०० रुपये प्रतिलीटरपेक्षा जास्त झाला आहे. त्यातही ७ शहरांमध्ये पेट्राेलची ११० रुपये अधिक दराने विक्री हाेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 05:08 AM2021-10-24T05:08:50+5:302021-10-24T05:09:41+5:30

Petrol Diesel Price : सद्य:स्थितीत देशातील सर्व राज्यांमध्ये पेट्राेलने शंभरी गाठली असून, प्रमुख शहरांमध्ये डिझेलचा दरही १०० रुपये प्रतिलीटरपेक्षा जास्त झाला आहे. त्यातही ७ शहरांमध्ये पेट्राेलची ११० रुपये अधिक दराने विक्री हाेत आहे.

In a year and a half, petrol has gone up by Rs 36 and diesel by Rs 27 | Petrol Diesel Price : दीड वर्षात तब्बल ३६ रुपयांनी पेट्राेल महागले, डिझेलचे दरही २७ रुपयांनी वाढले

Petrol Diesel Price : दीड वर्षात तब्बल ३६ रुपयांनी पेट्राेल महागले, डिझेलचे दरही २७ रुपयांनी वाढले

नवी दिल्ली : तेल कंपन्यांनी पेट्राेल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सलग पाचव्या दिवशी ३५ पैशांची वाढ केली आहे. गेल्या दीड वर्षामध्ये पेट्राेल ३६ रुपये आणि डिझेल २६.५८ रुपयांनी महाग झाले आहे. सद्य:स्थितीत देशातील सर्व राज्यांमध्ये पेट्राेलने शंभरी गाठली असून, प्रमुख शहरांमध्ये डिझेलचा दरही १०० रुपये प्रतिलीटरपेक्षा जास्त झाला आहे. त्यातही ७ शहरांमध्ये पेट्राेलची ११० रुपये अधिक दराने विक्री हाेत आहे.
काेराेना महामारीमुळे कच्च्या तेलाचे दर माेठ्या प्रमाणात घसरले. मात्र, त्याचा लाभ जनतेला मिळाला नाही. सरकारने मे २०२० मध्ये उत्पादन शुल्कामध्ये माेठी वाढ केली.  राज्यांनीही व्हॅट वाढविला. अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ लागताच कच्च्या तेलाचे दरही वाढले. सध्या कच्च्या तेलाचे दर ८५ डाॅलर्स प्रति बॅरल या पातळीवर आहेत.   पेट्राेलच्या दरात २८ सप्टेंबरपासून १९ वेळा तर डिझेलच्या दरात २४ सप्टेंबरपासून २२ वेळा वाढ करण्यात आली आहे. 

- केंद्रीय पेट्राेलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली हाेती. इंधनविक्रीवरील निधीचा वापर माेफत काेराेना लस, काेट्यवधी लाेकांना अन्न, घरगुती गॅसचा पुरवठा तसेच रस्तेबांधणी आणि इतर याेजनांसाठी हाेत आहे. 

प्रमुख शहरांमधील दर
शहर    पेट्राेल    डिझेल

मुंबई    ११३.१२    १०४.००
दिल्ली    १०७.२४    ९५.९७
काेलकाता    १०७.७८    ९८.७३
चेन्नई    १०४.२२    १००.२५
जयपूर    ११४.४८    १०५.७१
नागपूर    ११३.१०    १०२.४२
पुणे    ११३.२७    १०२.५५
औरंगाबाद    ११३.५४    १०२.८१
नाशिक    ११२.७२    १०२.०८
काेल्हापूर    ११३.५६    १०२.८५

Web Title: In a year and a half, petrol has gone up by Rs 36 and diesel by Rs 27

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.