प्रसाद गो. जोशी -
अमेरिकेने चीनवरील टॅरिफच्या घोषणेमुळे अमेरिकेतील शेअर बाजारात घसरण झाली असून, आगामी सप्ताहात जाहीर होणारी महागाईची आकडेवारी, आयटी आणि बँकींग कंपन्यांची तिमाही आकडेवारी आणि जागतिक स्तरावरील बाजाराची कामगिरी यावरूनच बाजाराची दिशा ठरणार आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखांच्या भाषणामधून आगामी काळातील व्याजदराबाबतचे संकेतही मिळू शकतात. अमेरिकेच्या शेअर बाजारात घसरण झाल्यामुळे परकीय वित्तसंस्था आता आशियाई देशांमधून आपली गुंतवणूक कमी करण्याची चर्चा आहे.
बँकींग व काही ’आयटी’च्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांची घोषणा होणार असून, त्यामधून बाजारात काही प्रमाणात वाढ अथवा घट होऊ शकते.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खनिज तेलाचे दर, डॉलर याबाबींवरही बाजाराची वाटचाल अवलंबून राहणार असल्याने त्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
परकीय वित्तसंस्थांकडून भारतामध्ये खरेदी
परकीय वित्तसंस्थांनी भारतीय शेअर बाजारामध्ये गतसप्ताहात खरेदी केली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या १० तारखेपर्यंत परकीय वित्तसंस्थांनी भारतीय शेअर बाजारामध्ये १७०८ कोटी रुपयांची खरेदी केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून
खरेदी करीत असलेल्या देशांतर्गत वित्तसंस्थांनी आपली खरेदी कायम ठेवली आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये देशांतर्गत वित्तसंस्थांनी बाजारामध्ये ४५९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामध्ये आगामी सप्ताहात कसा बदल होणार याकडे लक्ष देणेही महत्त्वाचे आहे.