Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ९५ पर्यंत जाणार रुपया? अमेरिका-इराण तणावादरम्यान आज १ डॉलरच्या तुलनेत ९३.३३ वर आपटला, काय म्हणाले एक्सपर्ट?

९५ पर्यंत जाणार रुपया? अमेरिका-इराण तणावादरम्यान आज १ डॉलरच्या तुलनेत ९३.३३ वर आपटला, काय म्हणाले एक्सपर्ट?

Rupee Falls: अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सातत्यानं सुरूच आहे. आज, १९ मार्च २०२६, गुरुवार रोजी रुपयानं सर्व रेकॉर्ड तोडले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 15:38 IST2026-03-19T15:36:40+5:302026-03-19T15:38:27+5:30

Rupee Falls: अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सातत्यानं सुरूच आहे. आज, १९ मार्च २०२६, गुरुवार रोजी रुपयानं सर्व रेकॉर्ड तोडले.

Will the rupee go up to 95 crude oil price Amid US Iran tensions hits 93 33 against 1 dollar today what did the experts say | ९५ पर्यंत जाणार रुपया? अमेरिका-इराण तणावादरम्यान आज १ डॉलरच्या तुलनेत ९३.३३ वर आपटला, काय म्हणाले एक्सपर्ट?

९५ पर्यंत जाणार रुपया? अमेरिका-इराण तणावादरम्यान आज १ डॉलरच्या तुलनेत ९३.३३ वर आपटला, काय म्हणाले एक्सपर्ट?

Rupee Falls: अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सातत्यानं सुरूच आहे. आज, १९ मार्च २०२६, गुरुवार रोजी रुपयानं सर्व रेकॉर्ड तोडत ९३.३३ चा नीचांकी स्तर गाठला. ही आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण असून, यामुळे भारतात महागाई वाढण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. बुधवारीच रुपया पहिल्यांदा प्रति डॉलर ९२.५७ च्या पातळीवर पोहोचला होता.

रुपया कमकुवत होण्याची प्रमुख कारणं

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्ध रुपयामधील या मोठ्या घसरणीचं मुख्य कारण ठरत आहे. या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्यात. डॉलरची किंमत वाढत असल्यामुळे भारतासारख्या देशांवर आयातीचा दबाव स्पष्टपणे दिसून येत आहे.

शेअर बाजारात मोठा भूकंप, Sensex २१०० पेक्षा अधिक अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांना ८.५ लाख कोटींचा झटका

फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाचा परिणाम

अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने १८ मार्च २०२६ रोजी व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. फेडनं व्याजदरात कपात न करण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. यासोबतच त्यांनी असा इशाराही दिला आहे की, जर मध्य-पूर्वेतील हा तणाव दीर्घकाळ सुरू राहिला, तर त्यामुळे महागाई वाढण्याचा धोका अधिक वाढू शकतो.

रुपया प्रति डॉलर ९५ पर्यंत जाण्याची शक्यता

'गोल्डमन सॅक्स'चे (Goldman Sachs) मुख्य अर्थतज्ज्ञ शंतनू सेनगुप्ता यांनी रुपयाच्या मूल्यात आणखी मोठ्या घसरणीचा इशारा दिला आहे. ब्लूमबर्गला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी नमूद केलं की, जर आखाती देशांमधील हा तणाव लवकर कमी झाला नाही, तर त्याचा थेट परिणाम भारतीय रुपयावर होईल. येत्या एका वर्षात रुपया प्रति डॉलर ९५ पर्यंत देखील घसरू शकतो.

रुपयातील घसरणीचा सर्वसामान्यांवर परिणाम

रुपया घसरणं म्हणजेच डॉलर महागणं, ज्यामुळे आयात महाग होते. याचा अर्थ परदेशातून खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तूंसाठी आपल्याला जास्त किंमत मोजावी लागेल. जेव्हा आयात महाग होते, तेव्हा देशांतर्गत महागाई देखील वाढते, ज्याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसतो. सध्या कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या पुरवठ्याबाबत आधीच मोठी खळबळ माजलेली आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील हा तणाव कच्चं तेल आणि डॉलरमधील तेजीला कारणीभूत ठरत आहे. जोपर्यंत हा तणाव निवळत नाही, तोपर्यंत सोन्या-चांदीच्या किमतींसोबतच रुपयावरही दबाव कायम राहू शकतो.

Web Title : अमेरिका-ईरान तनाव के बीच रुपया 93.33 तक गिरा; विशेषज्ञ ने दी 95 की चेतावनी।

Web Summary : अमेरिकी-ईरानी तनाव के कारण रुपया डॉलर के मुकाबले 93.33 के रिकॉर्ड निचले स्तर पर गिर गया, जिससे महंगाई बढ़ने की आशंका है। गोल्डमैन सैक्स का अनुमान है कि तनाव जारी रहने पर यह और गिरकर 95 तक जा सकता है, जिससे तेल की कीमतों में वृद्धि के कारण आयात लागत और दैनिक खर्च प्रभावित होंगे।

Web Title : Rupee plunges to 93.33 amid US-Iran tensions; expert warns of 95.

Web Summary : The rupee crashed to a record low of 93.33 against the dollar due to US-Iran tensions, fueling inflation fears. Goldman Sachs predicts further decline to 95 if tensions persist, impacting import costs and everyday expenses due to rising oil prices.