Lokmat Money > बिझनेस न्यूज > तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

to turkey and azerbaijan : तुर्कस्तान आणि अझरबैजानने पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्यामुळे संतप्त झालेल्या भारतीयांनी या देशांमधील उत्पादने आणि सहलींवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 17:07 IST2025-05-14T17:06:20+5:302025-05-14T17:07:03+5:30

to turkey and azerbaijan : तुर्कस्तान आणि अझरबैजानने पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्यामुळे संतप्त झालेल्या भारतीयांनी या देशांमधील उत्पादने आणि सहलींवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे.

Will IndiGo send planeno suspension of flights from india to turkey and azerbaijan says indigo s to Turkey and Azerbaijan? IndiGo company gives big update | तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

turkey and azerbaijan : पाकिस्तानसोबतच्या संघर्षात तुर्कस्तान आणि अझरबैजानने भारताविरुद्ध मदत केल्यामुळे देशभरातील नागरिक संतप्त झाले आहेत. या दोन्ही देशांमधील उत्पादनांवर आणि तेथील सहलींच्या योजनांवर भारतीयांनी बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर '#बॉयकॉटअझरबैजान' आणि '#बॉयकॉटतुर्किए' हे ट्रेंड जोर धरत आहेत. विमान कंपन्यांनीही या देशांमध्ये आपली उड्डाणे रद्द करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

या पार्श्वभूमीवर, देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने स्पष्ट केले आहे की त्यांची या दोन्ही देशांमधील कोणतीही उड्डाणे रद्द केली जाणार नाहीत. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तुर्कस्तानला जाणाऱ्या विमान प्रवाशांच्या संख्येत कोणतीही घट झालेली नाही. भविष्यात मागणी घटल्यास यावर विचार केला जाईल. तसेच, अझरबैजानला जाणाऱ्या विमानांची संख्या कमी करण्याचा कोणताही विचार सध्या कंपनी करत नाही, कारण तेथेही प्रवाशांची मागणी कायम आहे. दरम्यान, काही इतर विमान कंपन्यांनी ९ मे नंतर तुर्कस्तान आणि अझरबैजानसाठी बुकिंग घेणे बंद केले होते.

प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ
गेल्या काही वर्षांत भारत आणि या दोन्ही देशांदरम्यान प्रवासा करणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. २०१४ मध्ये केवळ ४,८५३ भारतीयांनी अझरबैजानला भेट दिली होती, तर २०२४ पर्यंत ही संख्या २,४३,५८९ पर्यंत पोहोचली. पुढील १० वर्षांत ही संख्या आणखी ११ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, २०१४ मध्ये १,१९,५०३ भारतीय तुर्कस्तानला गेले होते, तर २०२४ मध्ये हा आकडा ३.३० लाखांवर पोहोचला आहे. इंडिगो सध्या भारत आणि तुर्कस्तान दरम्यान दररोज दोन विमानांची वाहतूक करते. तुर्कस्थान एअरलाइन्स देखील दिल्ली आणि मुंबईसाठी दररोज आणि चेन्नईसाठी दिवसातून एकदा उड्डाण चालवते.

व्यापाऱ्यांचाही बहिष्कार
फक्त सामान्य नागरिकच नव्हे, तर भारतीय व्यापाऱ्यांनीही तुर्कस्थानातून येणाऱ्या सफरचंदांवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तुर्कस्तानचे सफरचंद आता बाजारात जवळपास दिसत नाहीत. भारतीय व्यापारी आता इराणी, वॉशिंग्टन आणि न्यूझीलंडमधील सफरचंदांना अधिक मागणी करत आहेत. या बहिष्काराचा परिणाम म्हणून किरकोळ बाजारात सफरचंदाच्या किमतीत प्रति किलो २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे.

वाचा - गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!

तुर्कस्तानचा पाकिस्तानला उघड पाठिंबा
तुर्कस्तान नेहमीच पाकिस्तानचा समर्थक राहिला आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादावर तुर्कस्तानने कधीही आवाज उठवलेला नाही. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्यावर तुर्कस्तानने पाकिस्तानला सुमारे ३५० ड्रोन पाठवून मदत केली होती. यावेळेस अझरबैजाननेही पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना पत्र लिहून संघर्षात पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे भारतीयांमध्ये या दोन्ही देशांविरुद्ध तीव्र नाराजी आहे.

Web Title: Will IndiGo send planeno suspension of flights from india to turkey and azerbaijan says indigo s to Turkey and Azerbaijan? IndiGo company gives big update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.