lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Go First पुन्हा उड्डाण घेणार? अजय सिंग, निशांत पिट्टी १००० कोटींना विकत घेण्याची शक्यता

Go First पुन्हा उड्डाण घेणार? अजय सिंग, निशांत पिट्टी १००० कोटींना विकत घेण्याची शक्यता

गो फर्स्ट एअरलाइन्सच्या समस्या संपण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 03:01 PM2024-02-24T15:01:22+5:302024-02-24T15:02:36+5:30

गो फर्स्ट एअरलाइन्सच्या समस्या संपण्याची शक्यता आहे.

Will Go First airlines fly again Possibility of buying Ajay Singh easymytrip Nishant Pitti for 1000 crores details | Go First पुन्हा उड्डाण घेणार? अजय सिंग, निशांत पिट्टी १००० कोटींना विकत घेण्याची शक्यता

Go First पुन्हा उड्डाण घेणार? अजय सिंग, निशांत पिट्टी १००० कोटींना विकत घेण्याची शक्यता

गो फर्स्ट एअरलाइन्सच्या (Go First Airlines) समस्या संपण्याची शक्यता आहे. स्पाईसजेटचे (SpiceJet) सीएमडी अजय सिंग आणि बिझी बी एअरवेजनं (Busy Bee Airways) गो फर्स्टसाठी एक प्लॅन सादर केला आहे. या योजनेअंतर्गत गो फर्स्ट एअरलाइन्समध्ये १,६०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. 
 

EaseMyTrip चे मुख्य कार्यकारी अधिकारी निशांत पिट्टी यांचा बिझी बी एअरवेजमध्ये मोठा हिस्सा आहे. अजय सिंग आणि निशांक पिट्टी यांच्या कन्सोर्टियमनं सादर केलेल्या प्रस्तावात गो फर्स्टचे १,००० कोटी रुपयांच्या अधिग्रहणाचा समावेश आहे. यानंतर दोन्ही प्रवर्तक गो फर्स्टमध्ये ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करतील. गो फर्स्ट एअरलाइन्सची सेवा पुन्हा सुरू करणं हा त्याचा उद्देश आहे.
 

स्काय वननंही लावलीये बोली
 

अजय सिंग आणि निशांत पिट्टी यांच्या या कन्सोर्टियमची स्पर्धा स्काय वनशी करते. स्काय वननं इनसॉल्व्हन्सी रिझॉल्युशन प्रोसिडिंग्समध्ये GoFirst Airlines साठी बोली लावली आहे. ही शारजाहस्थित कंपनी आहे, जी प्रामुख्याने चार्टर्ड हेलिकॉप्टर आणि कार्गो सेवा चालवते. या निविदांचा विचार केला जाणार आहे. मार्चअखेर ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. गो फर्स्ट एअरलाइन्सचे प्रमोटर्स वाडिया कुटुंबीय आहेत. GoFirst ने स्वतःच गेल्या वर्षी मे महिन्यात नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) मध्ये दिवाळखोरीसाठी अर्ज केला होता.

 

रिझॉल्युशनसाठी ६० दिवसांची वेळ
 

अजय सिंग आणि निशात पिट्टी यांच्या कन्सोर्टियमनं १६ फेब्रुवारी रोजी गो फर्स्ट एअरलाइन्स घेण्यासाठी बोली सादर केली. त्यापूर्वी, १३ फेब्रुवारी रोजी, दिल्लीतील NCLT नं कॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रिया (CIRP) ६० दिवसांनी वाढवण्याच्या रिझोल्यूशन प्रोफेशनलच्या (RP) प्रस्तावाला मंजुरी दिली होती.

Web Title: Will Go First airlines fly again Possibility of buying Ajay Singh easymytrip Nishant Pitti for 1000 crores details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.