Home Loan & Personal Loan: बँकांकडून लोकांच्या गरज पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कर्ज दिली जातात. लोकांना घर खरेदी करण्यासाठी बँक होम लोन देते, कार खरेदी करण्यासाठी कार लोन घेता येतं, तर वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी लोक बँकेतून पर्सनल लोन देखील घेऊ शकता. अचानक पैशांची गरज पडल्यास लोक बँकेकडून पर्सनल लोन घेऊ शकतात. वेगवेगळ्या कर्जांसाठी बँकेचे व्याजदर वेगवेगळे असतात, पण वेगवेगळ्या कर्जांचे व्याजदर वेगवेगळे का असतात, हे आज आपण जाणून घेणार आहोत.
सुरक्षित आणि असुरक्षित कर्जामधील फरक
बँकांकडून अनेकदा होम लोन आणि कार लोन कमी व्याजदरावर दिले जातात. होम लोन आणि कार लोनचे व्याजदर ७ ते ९ टक्क्यांदरम्यान असतात. याउलट, बँकांकडून पर्सनल लोन खूप जास्त व्याजदरावर दिलं जातं. पर्सनल लोनचे व्याजदर १० ते २५ टक्क्यांपर्यंत असू शकतात. याचं कारण असे आहे की, होम लोन आणि कार लोन हे सुरक्षित कर्ज (Secured Loans) असतात. त्यामुळे त्यांचे व्याजदर कमी असतात. तर, पर्सनल लोन हे असुरक्षित कर्ज (Unsecured Loan) असते. त्यामुळे पर्सनल लोनचे व्याजदर अधिक असतात.
सोन्या-चांदीचे दर धडाम, Silver २२८० रुपयांनी स्वस्त; Gold मध्येही मोठी घसरण, पाहा नवे दर
पर्सनल लोनमध्ये बँकेला जास्त धोका
पर्सनल लोनचे व्याजदर अधिक असण्याचे कारण म्हणजे हे एक असुरक्षित कर्ज आहे, म्हणजेच पर्सनल लोनमध्ये बँकेला धोका असतो. पर्सनल लोनमध्ये बँक कोणतीही मालमत्ता किंवा मौल्यवान वस्तू गहाण ठेवत नाही. तसंच, पर्सनल लोन कमी मुदतीचे असते आणि बँक ते कोणत्याही हमीशिवाय देते. त्यामुळे पर्सनल लोनमध्ये बँकेला धोका जास्त असतो. या उच्च-धोक्यामुळेच बँक ग्राहकांना पर्सनल लोन जास्त व्याजदरावर देतात.
होम लोन हे सुरक्षित कर्ज
बँकांकडून होम लोन कमी व्याजदरावर दिले जाते. याचं कारण असं की, होम लोन हे एक सुरक्षित कर्ज असते. बँकांना हाऊसिंगसाठी स्वस्त कर्ज मिळतं. त्यामुळे ते लोकांना स्वस्त कर्ज देतात. तसंच, होम लोन दीर्घ मुदतीचे असतात आणि कर्जाची रक्कमही जास्त असते. त्यामुळे होम लोनमधून बँकांची चांगली कमाई होते. होम लोन न फेडल्यास बँक ग्राहकाची मालमत्ता जप्त करू शकते आणि आपली रक्कम परत घेऊ शकते. यामुळे बँकांना कोणताही धोका नसतो.
