Gold Silver Price 18 September: सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत अजूनही घसरण होत आहे. फेडरल रिझर्व बँकेच्या दर कपातीचा परिणाम दोन्ही मौल्यवान धातूंवर दिसून येत आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीशिवाय ७०७ रुपयांनी कमी होऊन १०९२६४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर चांदीचे दर जीएसटीशिवाय ११५० रुपये प्रति किलोनं घसरून १२५५६३ रुपये झाले आहेत.
२४ कॅरेट सोन्याचा भाव आज जीएसटीसह ११२५४१ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी १२९३२९ रुपये किलोवर पोहोचलाय.
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
सोने-चांदीच्या किमती का घसरल्या
"अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात २५ बेसिस पॉइंटची कपात करुन व्याजद ४.२५% वरून ४.०% केले आहेत. हे रत्नं आणि दागिने उद्योगासाठी दिलासादायक पाऊल आहे," अशी प्रतिक्रिया कामा ज्वेलरीचे व्यवस्थापकीय संचालक कोलिन शाह यांनी दिली. "सध्याच्या व्यापार अनिश्चिततेच्या आणि अलिकडेच लादलेल्या शुल्कामुळे निर्यातीवर दबाव येत असताना, हा निर्णय उद्योगाला एक नवीन चालना देऊ शकतो. अमेरिका ही भारतीय दागिन्यांसाठी एक प्रमुख बाजारपेठ आहे, म्हणून शुल्कानंतरच्या या व्याजदर कपातीमुळे निर्यातदारांना दिलासा मिळाला आहे आणि त्यामुळे व्यापार वाढण्याची शक्यता आहे," असंही ते म्हणाले.
पुढे काय असू शकते किंमत?
शाह यांच्या मते, भविष्यात भारतातील सोन्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे, परंतु जर डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला तर ही किंमत वाढ काही प्रमाणात नियंत्रित केली जाऊ शकते. अमेरिकेतील उत्पन्नातील घट गुंतवणूकदारांसाठी सोनं अधिक आकर्षक बनवू शकते, ज्यामुळे किमती उंचावलेल्या पातळीवर राहू शकतात.
सण आणि लग्नाच्या हंगामात काय होईल?
सण आणि लग्नाच्या हंगामात, किमतीत किंचित चढउतार असूनही देशांतर्गत बाजारपेठेत मागणी स्थिर राहण्याची अपेक्षा आहे. नजीकच्या काळात, भारतातील सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १,१०,००० ते १,१२,००० आणि आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति औंस ३,६०० ते ३,७०० डॉलर्सदरम्यान राहू शकतात."
या सप्टेंबरमध्ये सोनं प्रति १० ग्रॅम ६८७६ रुपयांनी महाग झालं आहे. तर, चांदीच्या किमतीत प्रति किलो ७९९१ रुपयांची वाढ झाली आहे. आयबीजेएच्या दरांनुसार, ऑगस्टच्या शेवटच्या व्यापार दिवशी सोनं प्रति १० ग्रॅम १०२३८८ रुपयांवर बंद झालं. चांदी देखील प्रति किलो ११७५७२ रुपयांवर बंद झाली.