Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा

भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा

सध्या भारतीय बिझनेसमन वरुण नवानी (Varun Navani) यांच्या लग्नाची इंटरनेटवर बरीच चर्चा आहे. याचं कारण म्हणजे त्यांच्या लग्नाची वरात अमेरिकेतील प्रसिद्ध वॉल स्ट्रीटवरून गेली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 10:11 IST2025-05-31T10:06:56+5:302025-05-31T10:11:37+5:30

सध्या भारतीय बिझनेसमन वरुण नवानी (Varun Navani) यांच्या लग्नाची इंटरनेटवर बरीच चर्चा आहे. याचं कारण म्हणजे त्यांच्या लग्नाची वरात अमेरिकेतील प्रसिद्ध वॉल स्ट्रीटवरून गेली.

who is varun navani Indian origin gujarati ai company owner whose baraat brought wall street to a halt see video | भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा

भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा

सध्या भारतीय बिझनेसमन वरुण नवानी (Varun Navani) यांच्या लग्नाची इंटरनेटवर बरीच चर्चा आहे. याचं कारण म्हणजे त्यांच्या लग्नाची वरात अमेरिकेतील प्रसिद्ध वॉल स्ट्रीटवरून गेली. यावेळी वॉल स्ट्रीट बंद करण्यात आलं होतं. वरुण नवानी यांनी अमांडा सोल सोबत विवाह केला. अमांडा मास्टरकार्डमध्ये रिस्क मॅनेजमेंट लीगल कम्प्लायन्स डायरेक्टर आहेत. त्यांच्या विवाह सोहळ्याला जवळपास ४०० लोक उपस्थित होते. 

या लग्नासाठी २० हून अधिक परवानग्या घेण्यात आल्या होत्या. फायनान्शियल एक्सप्रेसनं दिलेल्या माहितीनुसार, या परवानग्यांसाठी २५ हजार डॉलर्सपेक्षा (सुमारे २१ लाख रुपये) अधिक रक्कम मोजण्यात आली होती. मात्र, काही ठिकाणी याची किंमत ५० हजार डॉलरपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. वरुण नवानी यांना 'वॉल स्ट्रीटचा नवरदेव' असंही संबोधलं जात आहे. या वरातीनं वॉल स्ट्रीटचे रुपांतर पार्टीत केलं. तिथे डीजे वाजत होते आणि पाहुणे नाचत-गात होते.

'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?

कोण आहेत वरुण नवानी?

वरुण हे मूळचे गुजरातचे असून ते टेक कंपनी रोलाईचे संस्थापक आणि सीईओ आहेत. रोलाई एक एंटरप्राइझ एआय प्लॅटफॉर्म आहे. उच्च शिक्षण संस्थांसाठी डेटा विश्लेषणात्मक कौशल्यं शिकविण्याचे काम करते. २०२३ मध्ये फोर्ब्सच्या ३० अंडर ३० मध्येही वरुण यांचा समावेश करण्यात आला होता.


किती आला खर्च?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नासाठी ब्लॉक केलेल्या प्रत्येक ठिकाणाची किंमत २५,००० ते ६०,००० डॉलर्सपर्यंत होती. यात 'फायनान्शिअल डिस्ट्रिक्ट'मधील फूटपाथ आणि रस्त्यांचा समावेश होता. रिपोर्टनुसार, वॉल स्ट्रीट भाड्यानं घेण्यासाठी ११,००० डॉलरपर्यंत खर्च येतो. न्यूयॉर्कच्या महापौर कार्यालयानं या वरातीचं वर्णन 'एक्स्ट्रा लार्ज' इव्हेंट म्हणून केलंय.

या भव्य लग्नानं भारतातीलच नव्हे तर न्यूयॉर्कमधील लोकांचंही लक्ष वेधून घेतलंय. त्यांच्या लग्नाची नोंदणीही ऑनलाइन उपलब्ध आहे. यामध्ये होम डेकोर आणि युटिलिटी आयटमसह ब्लूमिंगडेलचे ३० हून अधिक वस्तू आहेत. पाश्चिमात्य देशांमध्ये लग्नानंतर भेटवस्तू मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे मॅरेज रजिस्ट्री हा आहे.

Web Title: who is varun navani Indian origin gujarati ai company owner whose baraat brought wall street to a halt see video