Apple COO Sabih Khan: भारतीय वंशाच्या सबीह खान यांच्यावर अॅपल (Apple) कंपनीत मोठी जबाबदारी देण्याच आलीये. त्यांच्या खांद्यावर कंपनीच्या चीफ ऑपरेशन ऑफिसर (सीओओ) या पदाची जबाबदारी सोपवण्यात आलीये. कंपनीनं याची घोषणा केली असून ते बऱ्याच काळापासून कंपनीमध्ये सेवा बजावत असल्याचं सांगितलं आहे. सबीह खान यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे झालाय.
सबीह खान आता जेफ विल्यम्स यांची जागा घेतील, जे दीर्घकाळ आयफोन निर्माता अॅपलचे चीफ ऑपरेशन ऑफिसर होते. आता याच महिन्यात विल्यम्स आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. या वर्षाच्या अखेरीस ते निवृत्त होणार आहेत.
आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
उत्तर प्रदेश ते अमेरिका प्रवास
सबीह खान यांचा जन्म १९६६ मध्ये उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे झाला. शालेय शिक्षणादरम्यान ते सिंगापूरला गेले आणि नंतर अमेरिकेत स्थायिक झाले. त्यांनी टफ्ट्स विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि यांत्रिकी अभियांत्रिकीमध्ये डबल बॅचलर पदवी मिळवली आणि नंतर त्यांनी रेन्सेलेर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून (आरपीआय) मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. सबीह खान यांची नियुक्ती हा भारतासाठी, एक अभिमानाचा क्षण आहे.
३० वर्षांपूर्वी सुरुवात
सबीह यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात जीई प्लास्टिक्समध्ये केली, जिथे त्यांनी अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट इंजिनिअर आणि टेक्निकल लीडर म्हणून काम केलं. त्यानंतर ते १९९५ मध्ये अॅपलच्या (Career at Apple) प्रोक्योरमेट डिपार्टमेंटमध्ये सामील झाले आणि तेव्हापासून ते कंपनीशी जोडले गेलेत. २०१९ मध्ये, त्यांना अॅपलच्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. या भूमिकेत, त्यांनी अॅपलच्या जागतिक पुरवठा साखळीत सुधारणा करण्याचं काम केलं, ज्यामध्ये नियोजन, खरेदी, उत्पादन, लॉजिस्टिक्स आणि उत्पादन पुरवठा यांचा समावेश आहे.