जगप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानींचा मुलगा जीत अदानी याचे लग्न येत्या ७ फेब्रुवारीला होणार आहे. स्वत: गौतम अदानींनी याची माहिती दिली आहे. जीतचे लग्न अत्यंत साध्या पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गौतम अदानींची सून एका हिरे व्यापाऱ्याची मुलगी आहे.
जीत अदानीची होणारी पत्नी ही दिवा जैमिन शाह आहे. जीत आणि दिवाचा साखरपुडा १२ मार्च २०२३ लाच झाला होता. आज गौतम अदानी महाकुंभमध्ये आले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी होती. इथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मुलाच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे.
दिवा हिचे वडील जैमिन शाह यांची दिनेश अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. ते सूरतच्या बड्या हिरे व्यापाऱ्यांपैकी एक आहेत. साखरपुडा गुप्त ठेवण्यात आला होता. केवळ मोजक्याच लोकांना याची माहिती होती. आता अदानींनीच याची माहिती दिली आहे.
अदानींची होणारी सून दिवा ही प्रसिद्धीपासून दूर आहे. यामुळे तिची जास्त माहिती उपलब्ध नाही. परंतू, ती वडिलांना व्यवसायात मदत करते.