Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > काय आहे UPI Now Pay Later सुविधा? पाहा कसं करतं हे काम, काय आहेत याचे फायदे?

काय आहे UPI Now Pay Later सुविधा? पाहा कसं करतं हे काम, काय आहेत याचे फायदे?

UPI Now Pay Later: बँक खात्यात कमी शिल्लक असल्यामुळे तुमचं UPI पेमेंट कधी अडकलंय का? आता तुम्हाला या समस्येतून दिलासा मिळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 08:33 IST2026-01-27T08:30:47+5:302026-01-27T08:33:33+5:30

UPI Now Pay Later: बँक खात्यात कमी शिल्लक असल्यामुळे तुमचं UPI पेमेंट कधी अडकलंय का? आता तुम्हाला या समस्येतून दिलासा मिळणार आहे.

What is UPI Now Pay Later facility See how it works what are its benefits know details | काय आहे UPI Now Pay Later सुविधा? पाहा कसं करतं हे काम, काय आहेत याचे फायदे?

काय आहे UPI Now Pay Later सुविधा? पाहा कसं करतं हे काम, काय आहेत याचे फायदे?

UPI Now Pay Later: बँक खात्यात कमी शिल्लक असल्यामुळे तुमचं UPI पेमेंट कधी अडकलंय का? आता तुम्हाला या समस्येतून दिलासा मिळणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं (NPCI) UPI युजर्ससाठी ‘UPI Now Pay Later’ हे नवीन आणि अत्यंत उपयुक्त फीचर लाँच केलंय. याला 'UPI द्वारे प्री-अप्रूव्ड क्रेडिट लाइन' असंही म्हणतात. या सुविधेमुळे UPI आता केवळ तुमच्या बँक खात्यातील शिलकीपुरतं मर्यादित राहणार नाही, तर गरज पडल्यास तुम्ही बँकेकडून आधीच मंजूर केलेल्या क्रेडिटचा वापर करून त्वरित पेमेंट करू शकता.

UPI Now Pay Later म्हणजे काय?

ही एक डिजिटल क्रेडिट सुविधा आहे, ज्याअंतर्गत बँका ग्राहकांना 'प्री-अप्रूव्ड क्रेडिट लिमिट' (आधीच मंजूर केलेली पत मर्यादा) देतात. या मर्यादेचा वापर करून युजर्स UPI द्वारे त्वरित पेमेंट करू शकतात आणि ठराविक मुदतीत ती रक्कम नंतर परत करू शकतात. ही सुविधा शॉर्ट-टर्म क्रेडिटसारखी काम करते आणि विशेषतः खात्यात पुरेशी शिल्लक नसताना खूप उपयुक्त ठरते.

ही सुविधा कशी काम करते?

बँक किंवा कर्ज देणारी संस्था युजरचं प्रोफाइल आणि क्रेडिट स्कोर तपासून एक निश्चित क्रेडिट मर्यादा ठरवते (उदा. ₹२०,००० ते ₹५०,००० पर्यंत). UPI पेमेंट करताना युजर्स त्यांच्या बँक खात्याऐवजी 'क्रेडिट लाइन' निवडू शकतात. यामुळे पेमेंट त्वरित पूर्ण होतं आणि वापरलेली रक्कम क्रेडिट मर्यादेतून वजा केली जाते. बिलिंग सायकल पूर्ण झाल्यावर वापरलेल्या रकमेचं बिल जनरेट होतं, जे ठराविक अटींनुसार भरावं लागतं.

या सुविधेचे प्रमुख फायदे

त्वरित क्रेडिट सुविधा: खात्यात कमी शिल्लक असतानाही विनाअडथळा पेमेंट शक्य.
व्यापक स्वीकार्यता: जिथे UPI स्वीकारलं जातं, तिथे सर्वत्र या सुविधेचा वापर करता येतो.
फ्लेक्सिबल पेमेंट पर्याय: ठराविक काळानंतर पैसे भरण्याची सोय.
पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया: कागदपत्रांच्या कटकटीशिवाय सोपी आणि जलद ऑनबोर्डिंग.

पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे

ही सुविधा मिळवण्यासाठी खालील अटी पूर्ण करणं आवश्यक आहे:

वयोमर्यादा १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावी.
अर्जदार भारतीय नागरिक असणं अनिवार्य आहे.
मोबाइल नंबरशी लिंक असलेलं पॅन (PAN) आणि आधार कार्ड असणं आवश्यक आहे.
UPI अॅड केलेल्या बँकेत सक्रिय खातं असावं.
तुमचा सिबिल (CIBIL) स्कोर ७५० किंवा त्यापेक्षा जास्त असावा. 

Web Title : UPI अब बाद में भुगतान करें: UPI भुगतान के लिए तत्काल क्रेडिट

Web Summary : UPI अब बाद में भुगतान करें कम खाते की शेष राशि के साथ भी निर्बाध लेनदेन के लिए पूर्व-अनुमोदित क्रेडिट प्रदान करता है। बैंक क्रेडिट सीमा प्रदान करते हैं, जिससे त्वरित भुगतान और लचीला पुनर्भुगतान संभव है। यह पैन, आधार और अच्छे सिबिल स्कोर की आवश्यकता वाली पूरी तरह से डिजिटल प्रक्रिया है।

Web Title : UPI Now Pay Later: Instant Credit for UPI Payments Explained

Web Summary : UPI Now Pay Later offers pre-approved credit for seamless transactions, even with low account balances. Banks provide credit limits, enabling instant payments and flexible repayment. It's a fully digital process requiring PAN, Aadhaar, and a good CIBIL score.

टॅग्स :MONEYपैसा