Specialized Investment Fund : भारतीय भांडवल बाजार नियामक 'सेबी'ने एप्रिल २०२५ पासून देशातील गुंतवणूकदारांसाठी 'स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड' ही एक नवीन आणि हायटेक मालमत्ता श्रेणी सुरू केली आहे. म्युच्युअल फंड, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड यांच्यातील मोठी दरी भरून काढण्यासाठी हा पर्याय आणला गेला आहे. ज्या गुंतवणूकदारांकडे १० लाख रुपयांपर्यंतचे भांडवल आहे, त्यांच्यासाठी हा 'इन्व्हेस्टमेंट स्टार' ठरणार आहे.
SIF, PMS आणि AIF मधील नेमका फरक काय?
- गुंतवणूक करण्यापूर्वी या तिन्ही पर्यायांमधील गुंतवणुकीची मर्यादा समजून घेणे आवश्यक आहे.
- AIF (अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड) : हे फंड प्रामुख्याने रिअल इस्टेट, खासगी कंपन्या किंवा हेज फंडमध्ये गुंतवणूक करतात. यासाठी किमान १ कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक असते.
- PMS (पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस) : येथे प्रोफेशनल मॅनेजर तुमच्या उद्दिष्टांनुसार वैयक्तिक पोर्टफोलिओ सांभाळतात. यासाठी किमान ५० लाख रुपयांची मर्यादा आहे.
- SIF (स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड) : हा नवीन पर्याय असून यात किमान १० लाख रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही आधुनिक रणनीतींचा लाभ घेऊ शकता.
SIF कोणासाठी आणि कशासाठी?
- जे गुंतवणूकदार म्युच्युअल फंडपेक्षा अधिक आक्रमक किंवा विशेष रणनीती शोधत आहेत, पण ज्यांच्याकडे ५० लाख रुपये नाहीत, त्यांच्यासाठी एसआयएफ हा उत्तम मार्ग आहे.
- इक्विटी लाँग-शॉर्ट : शेअर्सच्या वाढत्या आणि घसरत्या दोन्ही किमतींमधून नफा मिळवण्याचा प्रयत्न.
- डेब्ट लाँग-शॉर्ट : कर्जरोख्यांच्या किमतींमधील चढ-उताराचा फायदा.
- हायब्रिड रणनीती : शेअर्स आणि डेट यांचे अचूक मिश्रण.
एसआयपी आणि विड्रॉलची सुविधा
म्युच्युअल फंडप्रमाणेच एसआयएफमध्येही लवचिकता देण्यात आली आहे. १० लाख रुपयांची किमान गुंतवणूक एकदा केल्यानंतर, गुंतवणूकदार १०,००० रुपयांची मासिक एसआयपी, एसटीपी किंवा सिस्टेमॅटिक विड्रॉल प्लॅन सुरू करू शकतात. यामुळे मध्यम-उच्च उत्पन्न गटातील गुंतवणूकदारांना शिस्तबद्ध गुंतवणुकीची संधी मिळणार आहे.
वाचा - आता PF च्या कामासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; 'पासपोर्ट केंद्रां'प्रमाणे मिळणार सेवा
बाजारात 'या' ४ दिग्गज कंपन्यांचे प्रोडक्ट्स दाखल
सेबीच्या मंजुरीनंतर चार मोठ्या ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांनी आपले एसआयएफ फंड लाँच केले आहेत.
- एसबीआय म्युच्युअल फंड : 'मॅग्नम SIF'
- एडलवाईज म्युच्युअल फंड : 'अल्टिव्हा SIF'
- क्वांट म्युच्युअल फंड : 'qSIF'
- आयटीआय म्युच्युअल फंड : 'डिव्हिनिटी SIF'
