Property Rules : अनेकदा सरकारी किंवा खासगी मालमत्ता ९९ वर्षांच्या भाडेकरारावर दिल्या जातात. तुम्ही सध्या राहत असलेले घर किंवा फ्लॅट एकतर फ्री होल्ड किंवा लीज होल्ड असेल. सामान्यत: शहरांमध्ये फ्लॅट्स लीज होल्डवर विकले जातात. फ्लॅट खरेदी करणाऱ्या अनेकांना आपला फ्लॅट भाडेतत्त्वावर असल्याची माहिती नसते. इतकेच काय, भाडेपट्टा संपल्यानंतर त्यांच्या फ्लॅटचे काय होईल? याबाबतही अनेकजण अनभिज्ञ असतात. ९९ वर्षांचा भाडेपट्टा संपल्यानंतर मालमत्तेचे काय होईल, हे भाडेपट्ट्याच्या करारावर आणि जमिनीच्या मालकीच्या प्रकारावर अवलंबून असते. चला सविस्तर समजून घेऊ.
लीज संपल्यानंतर तुमच्या मालमत्तेचे काय होईल?
लीजवर खरेदी केलेल्या मालमत्तेचा कालावधी ३० वर्षे ते ९९ वर्षांसाठी असतो. निवासी सदनिकेचा भाडेपट्टा सहसा ९० वर्ष ते ९९ वर्षांच्या दरम्यान असतो. जेव्हा एखादा बिल्डर तुम्हाला भाडेतत्त्वावर फ्लॅट विकतो. तेव्हा भाडेपट्टा सुरू करण्याच्या कालावधीत त्या फ्लॅटवर तुमचा मालकी हक्क असतो. भाडेपट्टा संपल्यानंतर, फ्लॅटचा मालक पुन्हा बिल्डर होतो. समजा, तुम्ही एखाद्या शहरात २०२५ मध्ये ९९ वर्षांच्या लीजवर १ कोटी रुपयांना फ्लॅट घेतला आहे. आता तुमच्या फ्लॅटची लीज २१९४ मध्ये संपेल. अशा परिस्थितीत २१९४ पर्यंत त्या फ्लॅटवर तुमचे पूर्ण हक्क आहेत. पण ही लीज संपल्यानंतर त्या फ्लॅटवरील तुमचे मालकी हक्कही संपुष्टात येतील. लीज संपल्यानंतर बिल्डर तुमच्या फ्लॅटचे काहीही करू शकतो.
वाचा - काही मिनिटांत सेन्सेक्स ११०० अंकांनी कोसळला; या ३ घटकांमुळे बाजारात मोठी घसरण
मालमत्ता लीज होल्डवरून फ्री होल्डमध्ये कशी बदलते?
वास्तविक, सरकार वेळोवेळी अशा अनेक योजना राबवते. ज्यामध्ये लीज होल्ड मालमत्ता फ्री होल्डमध्ये बदलली जाऊ शकते. यासाठी तुम्हाला फी भरावी लागेल. या नियमानुसार, जेव्हा तुमच्या फ्लॅटची लीज संपते, तेव्हा तुमचा फ्लॅट लीज होल्डमधून फ्री होल्ड होतो. याशिवाय, मालमत्तेचा भाडेपट्टा वाढवण्याच्या योजना देखील आहेत. त्यासाठी देखील तुम्हाला फी देखील भरावी लागेल.