EPFO Money: नोकरी बदलली म्हणून तुमचा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) नष्ट होत नाही. बहुतांश वेळा तुमच्या खात्यात साठलेली रक्कम तुमच्या युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) अंतर्गत सुरक्षित राहते. नवीन नोकरीत गेल्यावर त्या यूएएनला नवीन मेंबर आयडी जोडला जातो आणि ईपीएफ योग्य पद्धतीने हस्तांतरीत करावा लागतो. यात नियमांपेक्षा कागदी कार्यवाही आणि पोर्टलवरील त्रुटी यामुळेच जास्त अडचणी येतात. चला, याबाबत जाणून घेऊ या.
यूएएन नंबर आयुष्यभरासाठी असतो. कर्मचाऱ्याचा यूएएन मात्र, जुना यूएएन न दिल्यास किंवा नाव, जन्मतारीख अशा तपशिलांत तफावत असल्यास नवीन यूएएन तयार होऊ शकतो. अनेक यूएएन असल्यास सेवा कालावधी तुटतो, हस्तांतरण रखडते आणि पैसे काढताना अडथळे येतात.
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
कोणता आहे योग्य पर्याय?
फॉर्म १३ भरा. नोकरी बदलल्यावर ईपीएफ काढणे नव्हे, तर हस्तांतरण करणे, हा योग्य पर्याय आहे. फॉर्म १३द्वारे हे काम ऑनलाइन करता येते. यामुळे कर्मचाऱ्याची सेवा सलग राहते. केवायसी करा अनेकदा केवायसी अपूर्ण असल्यानं प्रक्रिया अडकते. आधार, पॅन, बँक खातं जोडलेलं व मंजूर असणं गरजेचं आहे. नावातील छोटा फरकही अडचण निर्माण करू शकतो.
एक्झिट डेटही महत्त्वाची
एक्झिट डेट मागील नियोक्त्याने (रोजगारदाता कंपनी) 'एक्झिट डेट' अपडेट न केल्यास दावा थांबतो. त्यामुळे नोकरी बदलल्यानंतर हे तपासणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक जॉब स्वीचनंतर एकच यूएएन वापरा, केवायसी अपडेटेड ठेवा आणि ईपीएफ त्वरित हस्तांतरित करा. यामुळे भविष्यातील त्रास टाळता येतो.
