नवीन जीएसटी सुधारणांमुळे अनेक वस्तू आणि सेवांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. जीएसटी परिषदेच्या सध्याच्या बैठकीत अनेक वस्तूंवरील कर कमी करून ग्राहकांना मोठा दिलासा देण्यावर भर देण्यात आला आहे. दुसरीकडे, काही वस्तूंना 'लक्झरी' किंवा 'हानिकारक' श्रेणीत टाकून त्यांच्यावरील कर वाढवण्यात आला आहे. खालील तक्त्यात, जीएसटी दरातील बदलांमुळे कोणत्या वस्तू स्वस्त आणि कोणत्या वस्तू महाग, याची माहिती दिली आहे.
दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर होणार मोठी बचत
वस्तू पूर्वी आता
केसांचे तेल, शॅम्पू, टूथपेस्ट, साबण, टूथ ब्रश, शेव्हिंग क्रीम १८% ५%
लोणी, तूप, चीज, दुग्धजन्य पदार्थ, ड्रायफ्रुट्स १२% ५%
पनीर ५% शुन्य
पॅकेज्ड नमकीन, भुजिया १२% ५%
भांडी, शिवणयंत्र व त्याचे भाग १२% ५%
बाळांसाठीच्या बाटल्या, नॅपकीन व डायपर्स १२% ५%
१२% ५%
शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी दिलासा
ट्रॅक्टर टायर व भाग १८% ५%
ट्रॅक्टर १२% ५%
ठराविक जैव-कीटकनाशके, सूक्ष्म पोषकद्रव्ये १२% ५%
ठिबक सिंचन प्रणाली व स्प्रिंकलर १२% ५%
कृषी, बागायती, वनीकरणासाठी यंत्रे
(जमीन तयार करणे, पेरणी, कापणीसाठी) १२% ५%
आरोग्य क्षेत्रात दिलासा
वैयक्तिक आरोग्य व जीवन विमा १८% शून्य
तापमापक १२% ५%
वैद्यकीय दर्जाचे ऑक्सिजन १२% ५%
सर्व निदान किट्स १२% ५%
ग्लुकोमीटर व टेस्ट स्ट्रिप्स १२% ५%
चष्मे १२% ५%
वाहने झाली स्वस्त
पेट्रोल-एलपीजी-सीएनजी हायब्रिड कार
(१२०० सीसी व ४००० मिमी पर्यंत) २८% १८%
डिझेल हायब्रिड कार (१५०० सीसी व ४००० मिमी पर्यंत) २८% १८%
तीन चाकी वाहने २८% १८%
मोटरसायकल (३५० सीसी पर्यंत) २८% १८%
मालवाहू मोटर वाहने २८% १८%
परवडणारे शिक्षण
नकाशे, चार्ट्स, ग्लोब १२% शून्य
पेन्सिल, शार्पनर, खडू, रंगीत पेन्सिली १२% शून्य
वह्या व नोटबुक्स १२% शून्य
रबर ५% शून्य
इलेक्ट्रॉनिक उपकरणे, घरांसाठी दिलासा
एअर कंडिशनर, टीव्ही (३२ इंचापेक्षा जास्त, एलईडी/एलसीडी) २८% १८%
सिमेंट २८% १८%
मॉनिटर्स व प्रोजेक्टर, डिशवॉशिंग मशीन २८% १८%