Baba Vanga Gold Prediction: वर्ष २०२५ मध्ये सोने आणि चांदीने नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. सोन्यानं आतापर्यंत सुमारे ८० टक्के परतावा दिला आहे, तर चांदीमध्येही १७० टक्क्यांहून अधिक तेजी आली आहे. आता सर्वांच्या नजरा वर्ष २०२६ कडे लागल्या आहेत. २०२६ मध्येही सोने-चांदीच्या किमती वाढणार की कमी होणार, याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, बाबा वेंगानंही २०२६ बाबत काही भाकितं केली आहेत. बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, सोने आणि चांदीच्या किमतींवर या वर्षात मोठा परिणाम दिसून येऊ शकतो.
२०२६ बदलांचं वर्ष
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, २०२६ हे बदलांचे वर्ष असेल. या वर्षी जुन्या शक्ती संपुष्टात येतील आणि नवीन शक्तींचा उदय होईल. असं मानलं जातं की, २०२६ मध्ये जगाच्या सत्तेचे केंद्र आशियाकडे सरकेल आणि चीन जगातील सर्वात मोठी लष्करी आणि आर्थिक शक्ती म्हणून उदयास येईल. बाबा वेंगानं २०२६ साठी आणखी एक भविष्यवाणी केली आहे की, या काळात एक मोठं युद्ध होईल, ज्याला त्या जागतिक संघर्ष मानतात. या गोष्टीमुळे त्यांची भाकितं खरोखर वास्तववादी आहेत की केवळ प्रतिकात्मक, यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
भू-राजकीय तणाव आणि जागतिक संघर्षाची शक्यता
बाबा वेंगाच्या मते, तैवान, दक्षिण चीन सागर आणि भारत-चीन सीमेवर मोठ्या अडचणी येणार आहेत. नवीन युती आणि प्रादेशिक विस्तारवादामुळे जागतिक व्यवस्था पूर्णपणे बदलली आहे. याचा अर्थ असा की या भागात तणाव वाढू शकतो आणि भू-राजकीय स्थिती बदलू शकते. त्यांच्या भाकितांमध्ये चीननं तैवानवर नियंत्रण मिळवणं आणि रशिया व अमेरिका यांच्यातील थेट संघर्षाचाही उल्लेख आहे.
याशिवाय, बाबा वेंगानं २०२६ मध्ये मोठ्या भू-राजकीय धक्क्यांचे भाकीत वर्तवलं आहे. त्यांनी तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात पाहिली होती, ज्यामध्ये त्यांनी प्रमुख जागतिक शक्तींमधील मोठ्या प्रमाणावरील लष्करी संघर्षाचे वर्णन केले होते. या संघर्षामुळे दीर्घकाळ राजकीय अशांती आणि आंतरराष्ट्रीय तणावात मोठी वाढ होऊ शकते.
सोने-चांदीच्या किमतींवरील संभाव्य परिणाम
बाबा वेंगा यांनी सोने आणि चांदीच्या किमतीबाबत कोणतीही थेट भविष्यवाणी केलेली नाही, परंतु त्यांनी जगातील ज्या उलथापालथींबद्दल सांगितलं आहे, त्याचा परिणाम सोने-चांदीच्या दरांवर नक्कीच दिसून येईल. जर बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरली आणि मोठं युद्ध झालं तर सोने आणि चांदीच्या किमती अधिक वाढतील. याचं कारण असं की जेव्हा जेव्हा जागतिक तणाव वाढतो, तेव्हा लोक सोने आणि चांदीसारख्या सुरक्षित मालमत्तेमध्ये (Safe Assets) गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. यामुळे सोने आणि चांदीची मागणी वाढते, परिणामी त्यांच्या किमतींना मोठी चालना मिळते.
यापूर्वीही केलेली भविष्यवाणी
यापूर्वी बल्गेरियन बाबा वेंगानं २०२६ मध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ होण्याची भविष्यवाणी केली होती. बाबा वेंगाच्या अंदाजानुसार, जगाच्या बाजारपेठांमध्ये उलथापालथ होऊ शकते, ज्यामुळे मंदीचे संकेत दिसू शकतात. जर बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली आणि जागतिक स्तरावर मोठं संकट आलं, तर सोन्याचे दर नवा विक्रम करू शकतात. जेव्हा चलन बाजार अस्थिर असतात तेव्हा लोक पुन्हा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळतील आणि यामुळे २०२६ मध्ये सोने विक्रमी उच्चांक गाठेल असा वेंगाचा विश्वास होता.
