Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > West Asia Conflict: रशियाची रोज ₹७२१२ कोटींची कमाई; अमेरिकेला रोज होतंय ₹१२,००० कोटींचं नुकसान, युद्धानं गणित बदललं

West Asia Conflict: रशियाची रोज ₹७२१२ कोटींची कमाई; अमेरिकेला रोज होतंय ₹१२,००० कोटींचं नुकसान, युद्धानं गणित बदललं

West Asia Conflict: पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ माजली आहे. याचा थेट फायदा रशियाला मिळत असून, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे रशियाची कमाई अनेक पटींनी वाढली आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 15:05 IST2026-03-28T15:04:26+5:302026-03-28T15:05:00+5:30

West Asia Conflict: पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ माजली आहे. याचा थेट फायदा रशियाला मिळत असून, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे रशियाची कमाई अनेक पटींनी वाढली आहे

West Asia Conflict Russia earns rs 7212 crores daily America loses rs 12000 crores daily war has changed the math | West Asia Conflict: रशियाची रोज ₹७२१२ कोटींची कमाई; अमेरिकेला रोज होतंय ₹१२,००० कोटींचं नुकसान, युद्धानं गणित बदललं

West Asia Conflict: रशियाची रोज ₹७२१२ कोटींची कमाई; अमेरिकेला रोज होतंय ₹१२,००० कोटींचं नुकसान, युद्धानं गणित बदललं

West Asia Conflict: पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ माजली आहे. याचा थेट फायदा रशियाला मिळत असून, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे रशियाची कमाई अनेक पटींनी वाढली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन सध्या कच्चं तेल आणि गॅसच्या विक्रीतून दररोज सुमारे ७६ कोटी डॉलर (सुमारे ७,२१२ कोटी रुपये) कमवत आहेत.

याउलट, इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेला दररोज सुमारे १२,००० कोटी रुपयांचा फटका बसत आहे. पेंटागन आणि 'CSIS' सारख्या थिंक-टँकच्या मते, अमेरिकेचा सरासरी खर्च दररोज १ अब्ज डॉलर ते १.४३ अब्ज डॉलरच्या दरम्यान आहे. अहवालानुसार, युद्धाच्या पहिल्या दोन दिवसांतच अमेरिकेने सुमारे ४७,००० कोटी रुपयांची युद्धसामग्री आणि क्षेपणास्त्रं खर्च केली आहेत.

Gold Rate Today: १७,५०० रुपयांपर्यंत महागलं सोनं; पुन्हा गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे का? जाणून घ्या

रशियाच्या कमाईत दुपटीनं वाढ होण्याची शक्यता

'कीव स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इन्स्टिट्यूट'च्या विश्लेषणानुसार, रशियाची ऊर्जेतून होणारी महिन्याची कमाई सुमारे १२ अब्ज डॉलरवरून २४ अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. रशियाला हा फायदा होण्यामागे काही प्रमुख कारणे आहेत.

  • युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलरच्या पार गेल्या आहेत.
  • अमेरिकेनं रशियन तेल खरेदीवरील निर्बंधांमध्ये तात्पुरती सवलत दिली आहे.
  • या सवलतीमुळे खरेदीदारांसाठी रशियन तेल घेणं सोपं आणि कमी जोखमीचं झालं आहे, ज्यामुळे मागणी वाढली आहे.

युद्धाच्या कालावधीनुसार रशियाच्या कमाईचे दोन पैलू

परिस्थिती १: संघर्ष लवकर थांबल्यास

जरी मध्यपूर्वेतील युद्ध लवकर शांत झालं, तरी रशियाचा वार्षिक तेल आणि गॅस महसूल २१८.५ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. हा आकडा पूर्वीच्या अंदाजापेक्षा ६३ टक्क्यांनी जास्त आहे.

परिस्थिती २: संघर्ष लांबल्यास

जर हे युद्ध अनेक महिने चाललं, तर रशियाला मिळणारा हा आर्थिक लाभ ३८६.५ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकतो, जो क्रेमलिनसाठी एक मोठा 'फायनान्शिअल बूस्ट' ठरेल.

जागतिक पुरवठा साखळी आणि खरेदीदार

होर्मुज सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत अडथळा आल्यानं जागतिक पुरवठा वेगानं कमी झाला आहे. अशा अनिश्चिततेच्या काळात भारत आणि चीन यांनी रशियाकडून तेल आयात वाढवली आहे. दोन्ही देशांनी आपल्या ऊर्जेच्या गरजांना प्राधान्य दिले असून, मध्यपूर्वेतील पुरवठ्यातील कमतरता भरून काढण्यासाठी रशियन तेलावर भर दिला आहे.

अमेरिकेला मोजावी लागणारी युद्धाची मोठी किंमत

इराणसोबतच्या लष्करी संघर्षामुळे अमेरिकेच्या तिजोरीवर मोठा ताण पडत आहे. अमेरिका दर सेकंदाला सुमारे ११,५०० डॉलर ते १६,५०० डॉलर युद्धाच्या आगीत झोकून देत आहे. पहिल्या ६ दिवसांत अमेरिकेचा खर्च ११.३ अब्ज डॉलरच्या पार गेला होता, जो १२ दिवसांत १६.५ अब्ज डॉलर झाला. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत हा खर्च २५ अब्ज डॉलर (२ लाख कोटी रुपयांहून अधिक) टप्पा गाठण्याची शक्यता आहे.

Web Title : पश्चिम एशिया संघर्ष: रूस का मुनाफा, अमेरिका को नुकसान।

Web Summary : पश्चिम एशिया संघर्ष से रूस को प्रतिदिन ₹7,212 करोड़ का तेल राजस्व प्राप्त हो रहा है। वहीं, ईरान के साथ संघर्ष में अमेरिका को प्रतिदिन ₹12,000 करोड़ का नुकसान हो रहा है। रूस की मासिक ऊर्जा आय दोगुनी हो सकती है, जबकि अमेरिका का युद्ध खर्च तेजी से बढ़ रहा है।

Web Title : West Asia conflict shifts economics: Russia profits, US faces losses.

Web Summary : West Asia conflict boosts Russia's oil revenues to ₹7,212 crores daily. Simultaneously, the US faces ₹12,000 crore daily losses due to involvement in the conflict with Iran. Russia's monthly energy income could double, while US war expenses rapidly escalate, straining its treasury.