भारतातील फिनटेक कंपन्या सातत्यानं प्रगती करत आहेत. जगभरात भारताचं नाव गाजत आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत ज्या डिजिटल पेमेंटला लोक एक नवीन गोष्ट मानत होते, तेच तंत्रज्ञान आज भारताची ओळख बनले आहे. या बदलाची जाणीव जगाला पुन्हा एकदा झाली, जेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टार्मर यांनी पेटीएमला 'भारतीय फिनटेक इंडस्ट्रीचा सुपरस्टार' म्हटलं. ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल २०२५ मध्ये ते बोलत होते, जिथे जगभरातील गुंतवणूकदार आणि टेक लीडर एकत्र आले होते.
स्टार्मर यांनी व्यासपीठावरून सांगितलं की, भारतीय फिनटेक कंपन्या आता केवळ देशासाठीच नाही, तर जगासाठी काम करत आहेत. त्यांनी मोठ्या आत्मविश्वासानं भारतीय उद्योजकांना ब्रिटनमध्ये व्यवसाय करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यांच्या मते, भारताच्या डिजिटल प्रवासानं हे सिद्ध केले आहे की येथील तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्समध्ये जगात बदल घडवून आणण्याची ताकद आहे. ते म्हणाले की, ब्रिटनला भारतासोबत मिळून फिनटेकच्या क्षेत्रात नवीन उंची गाठायची आहे.
एलजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओचं आज अलॉटमेंट, तुम्हाला मिळालेत का शेअर्स? कसं चेक कराल?
रोख रकमेवरील अवलंबित्व घटलं
यावेळी त्यांनी विशेषतः पेटीएमचे नाव घेत सांगितलं की, या कंपनीनं भारतात डिजिटल पेमेंट सोपं करून कोट्यवधी लोकांच्या जीवनात बदल घडवून आणलाय. गावापासून मोठ्या शहरांपर्यंत, दुकानदारांपासून ते ऑनलाइन व्यापाऱ्यांपर्यंत, पेटीएमनं रोख रकमेवरील अवलंबित्व कमी करून लोकांना नवीन सुविधा दिली आहे. याच कारणामुळे आता याला जागतिक स्तरावर सुपरस्टार म्हणून पाहिलं जात आहे.
पेटीएम आणणार एआय पॉवर्ड साउंडबॉक्स
या कार्यक्रमात पेटीएमनं देखील एक मोठी घोषणा केली. कंपनीनं भारतातील पहिले एआय-पॉवर्ड साउंडबॉक्स सादर केलं, जे दुकानदारांसाठी एका स्मार्ट असिस्टंटप्रमाणे काम करेल. हे उपकरण ११ भाषांमध्ये बोलू शकतं, त्वरित पेमेंट अपडेट्स देतं आणि व्यवसायाशी संबंधित आवश्यक माहिती देखील रिअल टाइममध्ये उपलब्ध करते. यामुळे लहान दुकानदार देखील आता तंत्रज्ञानाच्या मदतीने आपला व्यवसाय अधिक स्मार्ट आणि चांगला करू शकतील.