Lokmat Money > बिझनेस न्यूज > भाऊ, आम्हालाही कमवायचाय पैसा; ५ वर्षांत वाढले १४ कोटी गुंतवणूकदार!

भाऊ, आम्हालाही कमवायचाय पैसा; ५ वर्षांत वाढले १४ कोटी गुंतवणूकदार!

अधिक जोखीम स्वीकारण्याची युवकांची तयारी, तरुणांनाही भुरळ, ३९.५ टक्के तिशीतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 09:45 IST2025-05-24T09:45:00+5:302025-05-24T09:45:00+5:30

अधिक जोखीम स्वीकारण्याची युवकांची तयारी, तरुणांनाही भुरळ, ३९.५ टक्के तिशीतले

we also want to earn money 14 crore investors increased in 5 years | भाऊ, आम्हालाही कमवायचाय पैसा; ५ वर्षांत वाढले १४ कोटी गुंतवणूकदार!

भाऊ, आम्हालाही कमवायचाय पैसा; ५ वर्षांत वाढले १४ कोटी गुंतवणूकदार!

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : केलेली बचत वाढवायची असेल तर त्यासाठी शेअर बाजार हा पर्याय सर्वांनाच खुणावतो आहे. तरुणही याला अपवाद नाहीत. तरुण पिढी-जनरेशन-झेड (१९९७ - २०१२ दरम्यान जन्मलेले) मोठ्या प्रमाणात बाजाराकडे वळत आहे. बाजार नियामक संस्था भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळाचे (सेबी) अध्यक्ष तुहिन कांत पांडे म्हणाले की, सध्या बाजारात सुमारे एक-तृतीयांश गुंतवणूकदार तिशीतील आहेत.

येथे उएसोचॅमने आयोजित केलेल्या १६ व्या कॅपिटल मार्केट कॉन्फरन्समध्ये पांडे म्हणाले की, ‘हा कल केवळ औपचारिक आर्थिक प्रणालीमध्ये वाढत्या विश्वासाचे प्रतीक नाही तर दीर्घकालीन मालमत्ता निर्मिती आणि राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीत समावेशक सहभागाचे प्रतीक आहे. 

एकूण पोर्टफोलिओंची संख्या २३.४५ कोटींवर 

डिपॉझिटरीच्या आकडेवारीनुसार एप्रिल २०२५ पर्यंत देशातील एकूण डीमॅट खाती १९ कोटींपेक्षा अधिक झाली झाली आहेत. डिसेंबर २०२० मध्ये  डीमॅट खात्यांची संख्या ५ कोटींपेक्षाही कमी होती. पाच वर्षांत यात १४ कोटींची वाढ झाली आहे.

एनएसईच्या दरमहा प्रकाशित होणाऱ्या ‘मार्केट पल्स’ अहवालातून समजते की ३० वर्षांखालील गुंतवणूकदारांचा सहभाग मार्च २०१८ मध्ये २२.९ टक्के होता. तो मार्च २०२५ मध्ये ३९.५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

५० वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या गुंतवणूकदारांचा एकत्रित सहभाग याच काळात २५.८ टक्क्यांवरून १५.१ टक्क्यांपर्यंत घसरला आहे.

मागील काही वर्षांमध्ये म्युच्युअल फंडाद्वारे गुंतवणुकीतही झपाट्याने वाढ झाली आहे. मार्च २०२५ पर्यंत एकूण फोलिओंची (खाती) संख्या २३.४५ कोटी इतकी झाली असून वर्षभरापूर्वी ही संख्या १७.८ कोटी इतकी होती.

एसोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (एम्फी) आर्थिक वर्ष २०२५ च्या एका अहवालानुसार, २५ वर्षांखालील व्यक्तींनी केलेल्या गुंतवणुकीपैकी ४७% गुंतवणूक इक्विटीमध्ये होती. इक्विटीमध्ये पैसे गुंतवण्याचा कल वाढताना दिसत आहे. 

सेबी हे भांडवली निर्मितीचे शक्तिशाली इंजिन

पांडे म्हणाले की, डिजिटल परिवर्तन, कृत्रिम बुद्धिमत्तेचा उदय, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचे बळकट होणे यामुळे अभूतपूर्व प्रमाणावर कार्यक्षमती वाढली आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंगद्वारे १.७ लाख कोटी रुपये एवढी आतापर्यंतची सर्वाधिक निधी उभारण्यात आला आहे.

एप्रिलपर्यंत सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४२३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. आर्थिक वर्ष २०१९ मध्ये हे १५० लाख कोटी इतके होते. गुंतवणूकदारांच्या वाढता विश्वासाचे आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीचे हे प्रतीक आहे. सेबी हे वळ आर्थिक व्यवहार सुलभ करणारे माध्यम नसून भांडवली निर्मितीचे एक शक्तिशाली इंजिन आहे.

 

Web Title: we also want to earn money 14 crore investors increased in 5 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.