Lokmat Money > बिझनेस न्यूज > Vi नं दिली ग्राहकांना गुड न्यूज; Jio-Airtel नंतर व्हीआयदेखील देणार युजर्सना अनलिमिटेड डेटा

Vi नं दिली ग्राहकांना गुड न्यूज; Jio-Airtel नंतर व्हीआयदेखील देणार युजर्सना अनलिमिटेड डेटा

जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया म्हणजेच व्हीआय या भारतातील तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या आहेत. जिओ आणि एअरटेलनं आपल्या ग्राहकांसाठी ५जी सेवा खूप आधी सुरू केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 16:24 IST2025-01-13T16:24:44+5:302025-01-13T16:24:44+5:30

जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया म्हणजेच व्हीआय या भारतातील तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या आहेत. जिओ आणि एअरटेलनं आपल्या ग्राहकांसाठी ५जी सेवा खूप आधी सुरू केली होती.

Vodafone idea gives good news to its customers After Jio Airtel Vi will also offer unlimited data to its users | Vi नं दिली ग्राहकांना गुड न्यूज; Jio-Airtel नंतर व्हीआयदेखील देणार युजर्सना अनलिमिटेड डेटा

Vi नं दिली ग्राहकांना गुड न्यूज; Jio-Airtel नंतर व्हीआयदेखील देणार युजर्सना अनलिमिटेड डेटा

जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया म्हणजेच व्हीआय या भारतातील तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या आहेत. जिओ आणि एअरटेलनं आपल्या ग्राहकांसाठी ५जी सेवा खूप आधी सुरू केली होती, ज्याअंतर्गत दोन्ही कंपन्या आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड ५जीचा फायदा देत आहेत, परंतु व्हीआय या बाबतीत मागे राहिली. व्हीआयनं अद्याप देशभरात ५जी सेवा सुरू केलेली नाही. याशिवाय व्हीआयचे रिचार्ज प्लान्सही महाग आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांत व्हीआय युजर्सला मोठा फटका बसला आहे, पण आता व्हीआयनं आपल्या युजर्सना एक दिलासा देणारी बातमी दिली आहे.

व्हीआय अनलिमिटेड ४जी

जिओ आणि एअरटेलच्या अनलिमिटेड ५जी ला टक्कर देण्यासाठी व्होडाफोन आयडियानं आपल्या युजर्ससाठी अनलिमिटेड ४जी डेटाची सुविधा आणली आहे. व्हीआयच्या या नव्या फीचरमुळे व्हीआय युजर्स आता अनलिमिटेड डेटाचा फायदा घेऊ शकतील.

मिळणार अनलिमिटेड डेटा

व्हीआयनं आपल्या युजर्ससाठी असे अनेक प्लान लाँच केले आहेत, जे एफयूपी म्हणजेच फेअर युसेज पॉलिसीमध्ये येत नाहीत. हे प्लान व्हीआयच्या अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध आहेत. याशिवाय सध्या व्हीआय अनलिमिटेड ४जी सेवा मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशसह काही भागातच सुरू करण्यात आली आहे.

या प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा

व्हीआयच्या अनलिमिटेड ४जी डेटा सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही व्हीआयचा ३६५ रुपये, ३७९ रुपये, ४०७ रुपये, ४४९ रुपये, ४०८ रुपये, ४६९ रुपयांचा रिचार्ज प्लान खरेदी करू शकता. याशिवाय ६४९ रुपये, ९७९ रुपये, ९९४ रुपये, ९९६ रुपये, ९९७ रुपये, ९९८ रुपये आणि ११९८ रुपयांच्या प्लानमध्येही हा लाभ समाविष्ट आहे.

Web Title: Vodafone idea gives good news to its customers After Jio Airtel Vi will also offer unlimited data to its users

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.