Lokmat Money > बिझनेस न्यूज > प्रेयसीने सोडलं अन् तरुण रात्रीत झाला अब्जाधीश! ८४०० कोटींचा मालक म्हणतोय इतक्या पैशांचं काय करू?

प्रेयसीने सोडलं अन् तरुण रात्रीत झाला अब्जाधीश! ८४०० कोटींचा मालक म्हणतोय इतक्या पैशांचं काय करू?

Vinay Hiremath Loom : प्रेयसी सोडून गेल्यानंतर अनेकजण कंगाल झाल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. मात्र, एक तरुण अब्जाधीश झाल्याचं सांगितलं तर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 14:17 IST2025-01-06T14:15:28+5:302025-01-06T14:17:43+5:30

Vinay Hiremath Loom : प्रेयसी सोडून गेल्यानंतर अनेकजण कंगाल झाल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. मात्र, एक तरुण अब्जाधीश झाल्याचं सांगितलं तर?

vinay hiremath cofounder of loom sold his company in 975 million dollar | प्रेयसीने सोडलं अन् तरुण रात्रीत झाला अब्जाधीश! ८४०० कोटींचा मालक म्हणतोय इतक्या पैशांचं काय करू?

प्रेयसीने सोडलं अन् तरुण रात्रीत झाला अब्जाधीश! ८४०० कोटींचा मालक म्हणतोय इतक्या पैशांचं काय करू?

Vinay Hiremath Loom : प्रियकर प्रेयसीमधील वाद आपल्याला नवीन नाही. एकदाही वाद झाला नाही, असं जोडपं शोधूनही सापडणार नाही. कधीकधी हे वाद इतके टोकाला जातात की ऐकमेकांना सोडून देण्याचा निर्णय घेतला जातो. प्रियकर किंवा प्रेयसीने सोडून दिल्यानंतर सर्वसाधारण लोक काय करततात? काही आठवणीत कुढत बसतात, तर काही ही नाही तर दुसरी म्हणत पुढे जाण्याचा निर्णय घेतात. मात्र, एका पठ्ठ्याने जे केलं ते वाचून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. विनय हिरेमठ, असं या तरुणाचं नाव आहे. आपल्या प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्याने थेट कंपनीच विकली. आता तुम्ही म्हणाल असेल छोटा मोठा स्टार्टअप, पण किंमत वाचून तुमचेही डोळे पांढरे होतील. विनयने आपली कंपनी १०,२० कोटी रुपयांना नाही तर ९७५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ८४०० कोटी रुपये) मध्ये विकली आहे. आता सोशल मीडियावर म्हणतोय हे पैसे कसे खर्च करू?

कोण आहे विनय हिरेमठ?
३३ वर्षीय विनय हिरेमठ हे भारतीय वंशाचे व्यापारी असून ते अमेरिकेत राहतात. ते लूम कंपनीचे सह-संस्थापक राहिले आहेत. २०२३ मध्ये त्यांनी ९७५ दशलक्ष डॉलर्समध्ये आपले स्टार्टअप विकले होते. ते ॲटलासियनने (Atlassian) विकत घेतले होते. आपली कंपनी विकून विनय रातोरात अब्जाधीश झाला. त्यांनी एक दीर्घ ब्लॉग लिहिला असून यात सविस्तर माहिती दिली आहे.

ब्लॉगमध्ये काय लिहिले आहे?
विनयने ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, 'मी एक श्रीमंत व्यक्ती झालो आहे. आता माझ्या आयुष्याचे काय करावे हेच समजत नाही. गेले वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होते. गेल्या वर्षी कंपनी विकल्यानंतर, आता मला पुन्हा कधीही काम करण्याची गरज नाही अशा विचित्र परिस्थितीत सापडलो आहे. मला प्रत्येक गोष्टीत काहीतरी नवीन वाटतं, पण प्रेरणा मिळत नाही. मी आधीच इतके पैसे कमावले आहेत की त्याचे काय करावे हे मला कळत नाही.'

प्रेयसीसोबत ब्रेकअप
विनयने ब्लॉगमध्ये त्याच्या मैत्रिणीबद्दलही लिहिले आहे. त्याने लिहिले आहे की, 'माझ्या मैत्रिणीसोबत माझे २ वर्षांपासून अतिशय प्रेमळ संबंध होते. पण असुरक्षिततेमुळे तिच्याशी ब्रेकअप झाले. हा माझ्यासाठी खूप मोठा दुःखद धक्का होता. पण घेतलेला निर्णय योग्य होता. विनयने ब्लॉगमध्ये आपल्या मैत्रिणीची माफीही मागितली आहे. 'प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. मला माफ कर की तुला जे हवे होते ते मी होऊ शकलो नाही.'

कंपनीने दिली होती ऑफर 
विनयची कंपनी लूम विकत घेतलेल्या व्यक्तीने विनयला सीटीओ पद आणि ६० मिलियन डॉलरचे पॅकेज ऑफर केले होते. ॲटलासियनच्या या ऑफरवर आपण कोणताही निर्णय घेऊ शकत नसल्याचे विनयने सांगितले. विनयने लिहिले आहे की, त्याला इलॉन मस्कसारखे व्हायचे होते.
 

 

Web Title: vinay hiremath cofounder of loom sold his company in 975 million dollar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.