lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अनलिमिटेड डेटासह 6 महिन्यांची व्हॅलिडिटी; vi ने आणला जबरदस्त प्लॅन, किंमत फक्त...

अनलिमिटेड डेटासह 6 महिन्यांची व्हॅलिडिटी; vi ने आणला जबरदस्त प्लॅन, किंमत फक्त...

VI 180 days cheapest Recharge Plan: व्होडाफोन आयडियाच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 200 टीव्ही चॅनेल्स फ्री मिळतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 06:40 PM2024-03-13T18:40:14+5:302024-03-13T18:40:42+5:30

VI 180 days cheapest Recharge Plan: व्होडाफोन आयडियाच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 200 टीव्ही चॅनेल्स फ्री मिळतात.

VI 180 days cheapest Recharge Plan: 6 months validity with unlimited data at night; vi has come up with a great plan, price is just... | अनलिमिटेड डेटासह 6 महिन्यांची व्हॅलिडिटी; vi ने आणला जबरदस्त प्लॅन, किंमत फक्त...

अनलिमिटेड डेटासह 6 महिन्यांची व्हॅलिडिटी; vi ने आणला जबरदस्त प्लॅन, किंमत फक्त...

VI 180 days cheapest Recharge Plan: Jio आणि Airtel, या देशातील नंबर वन आणि नंबर टू टेलिकॉम कंपन्या आहेत. तर, Vodafone Idea (vi) यूजर बेसच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. पण, Vi कडे असे काही रिचार्ज प्लॅन आहेत, ज्यांच्या समोर Jio आणि Airtel विसरुन जाल. Vi ने त्यांच्या लाखो युजर्ससाठी अनेक उत्तमोत्तम प्लॅन्सचा समावेश केला आहे. तुम्ही VI युजर असाल आणि लॉन्ग व्हॅलेडिटी असलेल्या प्लॅनच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे.

VI मध्ये अल्पकालीन आणि दीर्घकालीन, अशा दोन्ही योजना आहेत. तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार तुम्ही कोणतीही योजना निवडू शकता. Vi कडे 150 दिवसांपेक्षा जास्त वैधता देणारे काही प्लॅन्स आहेत. हे प्लॅन्स तुम्हाला खुप फायद्याचे ठरू शकतात.

VIच्या यादीतील सर्वात परवडणारा प्लॅन
Vodafone Idea च्या यादीत एक प्लॅन आहे, ज्यामध्ये ग्राहकांना 180 दिवसांची दीर्घ वैधता मिळते. यामुळे तुम्हाला वारंवार रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. 6 महिन्यांची वैधता असलेल्या या प्लॅनची ​​किंमत 1449 रुपये आहे. Vi चा हा प्लॅन Jio आणि Airtel च्या 1499 रुपयांच्या प्लॅनला टक्कर देतो. या किमतीत Vi ग्राहकांना 180 दिवसांची वैधता देत आहे, तर Jio आणि Airtel फक्त 84 दिवसांची वैधता देतात. वैधतेच्या बाबतीत VI चा प्लॅन खूप पुढे आहे. 

डेटासह फ्री टीव्ही चॅनेलचे फायदे
VI च्या या 1449 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 270 GB डेटा, म्हणजेच दररोज 1.5GB डेटा मिळतो. तसेच तुम्ही मोफत एसएमएसचाही लाभ घेऊ शकता. Vi चा हा प्लान Binge ऑल नाईट ऑफरसह येतो, ज्यामध्ये तुम्हाला दररोज रात्री 6 तासांसाठी अमर्यादित डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना 200 हून अधिक टीव्ही चॅनेल विनामूल्य देते, ज्यामध्ये तुम्ही 5 हजारांहून अधिक चित्रपट आणि टीव्ही शो फ्री पाहू शकता.

Web Title: VI 180 days cheapest Recharge Plan: 6 months validity with unlimited data at night; vi has come up with a great plan, price is just...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.