Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'बिग ब्युटीफुल बिल' कार्यक्रमात दिली माहिती; भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत; दुग्धजन्य पदार्थांचे क्षेत्र प्रथमच खुले होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 07:46 IST2025-06-28T07:45:52+5:302025-06-28T07:46:39+5:30

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'बिग ब्युटीफुल बिल' कार्यक्रमात दिली माहिती; भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत; दुग्धजन्य पदार्थांचे क्षेत्र प्रथमच खुले होण्याची भीती

'Very big' trade deal with India; Donald Trump gave information, what is India's concern? | भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच एक ‘खूप मोठा’ व्यापार करार होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये आयोजित 'बिग ब्युटीफुल बिल' कार्यक्रमात ही माहिती दिली. ट्रम्प म्हणाले की अमेरिकेने अलीकडेच चीनसोबत व्यापार करार केला आहे आणि आता भारतासोबतही असाच एक व्यापार करार होणार आहे. अनेक देश करारासाठी उत्सुक आहेत.

२ एप्रिल रोजी ट्रम्प यांनी जगभरातील सुमारे १०० देशांवर टॅरिफ वाढविण्याची घोषणा केली होती. यामध्ये भारतावर २६ टक्के कर लादण्यात आला होता. त्यानंतर ट्रम्प प्रशासनाने तो ९० दिवसांसाठी पुढे ढकलला. हा करार भारताला जुलै २०२५ पर्यंत पूर्ण करायचा आहे. त्यातच आता ट्रम्प यांनी वरील वक्तव्य केल्याने दोन्ही देशांमधील बहुप्रतीक्षित द्विपक्षीय व्यापार कराराच्या वाटाघाटी प्रक्रियेत महत्त्वपूर्ण प्रगतीचे संकेत दिले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

ट्रम्प म्हणाले की, आमच्याकडे काही उत्तम करार आहेत. आम्ही आणखी एक करार करणार आहोत, शक्यतो भारतासोबत. तोही खूप मोठा... 

ट्रम्प पुढे म्हणाले की, चीन करारात, आम्ही चीनसाठी दरवाजे उघडण्यास सुरुवात करत आहोत. 

अशा गोष्टी कधीच घडल्या नाहीत...सर्व देशांशी खूप चांगले आहेत. मात्र, ट्रम्प यांनी चीनसोबतच्या कराराबद्दल माहिती दिली नाही. आम्ही सर्वांसोबत करार करणार नाही, मात्र त्यांना टॅफिरचे पत्र पाठवू, असे ते म्हणाले.

अमेरिकेला काय हवे?

अमेरिकेला काही औद्योगिक वस्तू, वाहने विशेषतः इलेक्ट्रिक वाहने, वाइन, पेट्रोकेमिकल उत्पादने, दुग्धजन्य पदार्थ आणि कृषी उत्पादने जसे की सफरचंद, जीएम पीक (मका, सोयाबीन) यामध्ये सवलत हवी आहे. अमेरिकेकडून भारताला पेट्रोलियम क्रूड, सोने, पेट्रोलियम उत्पादने, इलेक्ट्रॉनिक्सचे सुटे भाग, कोळसा मोठ्या प्रमाणावर मिळतो.

भारतासाठी आव्हान...

भारताला अमेरिकेच्या कृषी उत्पादनांसाठी कर सवलती देणे संकटात टाकणारे आहे. आतापर्यंत कोणत्याही 
करारांमध्ये भारताने दुग्धजन्य क्षेत्र उघडलेले नाही. जर कृषी आणि दुग्धजन्य उत्पादन अमेरिकेसाठी खुले केले तर भारतातील शेतकरी मोठ्या संकटात येण्याची भीती आहे.

भारताला काय हवे?

प्रस्तावित व्यापार करारात भारत कापड, रत्ने आणि दागिने, चामड्याच्या वस्तू, वस्त्रोद्योग, प्लॅस्टिक, रसायने, कोळंबी, तेलबिया, द्राक्षे आणि केळी यासारख्या कामगार-केंद्रित क्षेत्रांसाठी टॅरिफ सवलती 
मागत आहे. 

Web Title: 'Very big' trade deal with India; Donald Trump gave information, what is India's concern?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.