Lokmat Money > बिझनेस न्यूज > Ventive Hospitality IPO: येतोय 1600 कोटींचा आयपीओ, कधी होणार खुला?

Ventive Hospitality IPO: येतोय 1600 कोटींचा आयपीओ, कधी होणार खुला?

Ventive Hospitality IPO Details: ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियल्टीच्या व्हेटिंव हॉस्पिटॅलिटी कंपनीचा १६०० कोटी रुपयांचा आयपीओ लवकरच येणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 18:06 IST2024-12-15T18:03:32+5:302024-12-15T18:06:40+5:30

Ventive Hospitality IPO Details: ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियल्टीच्या व्हेटिंव हॉस्पिटॅलिटी कंपनीचा १६०० कोटी रुपयांचा आयपीओ लवकरच येणार आहे. 

Ventive Hospitality IPO: IPO of Rs 1600 crore is coming, when will it be open? | Ventive Hospitality IPO: येतोय 1600 कोटींचा आयपीओ, कधी होणार खुला?

Ventive Hospitality IPO: येतोय 1600 कोटींचा आयपीओ, कधी होणार खुला?

Ventive Hospitality IPO News: व्हेटिंव हॉस्पिटॅलिटी आयपीओ घेऊन येत आहे. १६०० कोटी रुपयांचा हा आयपीओ असणार आहे. ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियल्टीची भागीदारी असलेल्या व्हेटिंव हॉस्पिटॅलिटीचा आयपीओ १९ डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. कंपनीने १ कोटी रुपयांचे शेअर्स आपल्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवले आहेत. 

व्हेटिंग हॉस्पिटॅलिटीची रियल इस्टेट डेव्हलपर पंचशील रियल्टी आणि गुंतवणूक फर्म असलेल्या ब्लॅकस्टोन कंपनीकडे ८०.९० हिस्सेदारी आहे. आयपीओतून येणाऱ्या १६०० कोटी रुपये कंपनी कर्ज परतफेड करण्यासाठी आणि इतर आवश्यक कामांसाठी करणार आहे. सप्टेंबर २०२४ पर्यंत कंपनीवर एकूण ३,६०९.५ कोटी रुपये कर्ज होते. 
 
व्हेटिंव हॉस्पिटॅलिटी काय करते?

व्हेटिंव हॉस्पिटॅलिटी ही एक आदरातिथ्य करणाऱ्या क्षेत्रातील कंपनी आहे. अलिशान प्रॉपर्टींवर केंद्रस्थानी ठेवून कंपनी व्यवसाय करते. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये पुण्यातील जेडब्ल्यू मेरियट, द रिट्ज कार्लटन, मालदीवमधील कॉनराड, अनंतारा आणि राया बाय अटमॉस्फिअर या प्रॉपर्टीजचा समावेश आहे. ३० सप्टेंबर रोजीपर्यंत व्हेटिंग हॉस्पिटॅलिटीकडे भारत आणि मालदीव मधील ११ प्रॉपर्टीजचा समावेश आहे. 

व्हेटिंग हॉस्पिटॅलिटीचा आयपीओ १९ डिसेंबर रोजी खुला होणार असून, २४ डिसेंबर रोजी बंद होईल. ऑफरमधील ७५ टक्के हिस्सा क्लालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी असून, १० टक्के गुंतवणूकदारांसाठी १५ टक्के नॉन इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी आरक्षित करण्यात आलेले आहे. 

मार्च २०२४ आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल १,८४२ कोटी रुपये होता. २०२३ च्या आर्थिक वर्षाच्या १,६९९.४ कोटींच्या तुलनेत ८.४ टक्के जास्त होता. चालू आर्थिक वर्षात २०२५ पहिल्या सहामाहीमध्ये कंपनीने ८४६.४ कोटी रुपये महसूलावर १३७.८ नुकसान नोंदवले आहे.

(टीप - आयपीओबद्दल सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीबद्दलचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Ventive Hospitality IPO: IPO of Rs 1600 crore is coming, when will it be open?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.