lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेमीकंडक्टरवर वेदांतचा 'सुपर प्लॅन'! तैवान नव्हे तर जपान ताबा घेणार

सेमीकंडक्टरवर वेदांतचा 'सुपर प्लॅन'! तैवान नव्हे तर जपान ताबा घेणार

वेदांत समुह पुन्हा एकदा सेमीकंडक्टरवर काम करणार आहे, आता वेदांत कंपनी तैवान नाही तर जपानसोबत चर्चा करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 11:04 AM2023-10-18T11:04:03+5:302023-10-18T11:08:29+5:30

वेदांत समुह पुन्हा एकदा सेमीकंडक्टरवर काम करणार आहे, आता वेदांत कंपनी तैवान नाही तर जपानसोबत चर्चा करत आहे.

Vedanta's 'super plan' on semiconductors Japan will take over, not Taiwan | सेमीकंडक्टरवर वेदांतचा 'सुपर प्लॅन'! तैवान नव्हे तर जपान ताबा घेणार

सेमीकंडक्टरवर वेदांतचा 'सुपर प्लॅन'! तैवान नव्हे तर जपान ताबा घेणार

वेदांता समुहाचा सेमी कंडक्टरचा प्लॅट महाराष्ट्रात होणार होता. पण वेदांत समुह पुन्हा गुजरातला गेला. यानंतर काही दिवसातच तैवानी कंपनी फॉक्सकॉनने वेदांत समूह सोबतचा करार रद्द केला. आता पुन्हा एकदा वेदांता समुह सेमीकंडक्टरचा प्लॅट सुरू करणार असल्याची चर्चा सुरू आहे. आता कंपनी  वेदांत ग्रुपने टेक पार्टनरसाठी जपानी कंपन्यांशी बोलणे सुरू केले आहे. यामुळे आता गुजरातमध्ये लवकरात लवकर सेमीकंडक्टर प्लांट उभारता येणार आहे.

Bank of Baroda ची सर्वात मोठी कारवाई, ११ AGM सह ६० कर्मचारी निलंबित; वाचा कारण 

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील इलेक्ट्रॉनिक्स आणि मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या कंपन्यांसाठी ८० अब्ज डॉलर्सची ही मोठी संधी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुढील वर्षी जानेवारीमध्ये प्रस्तावित व्हायब्रंट गुजरात इन्व्हेस्टमेंट समिटच्या संदर्भात जपानमध्ये आयोजित केलेल्या रोड शोमध्ये हेब्बर सहभागी झाले होते. वेदांताने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हेब्बरने धोलेरा, गुजरात येथे सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले प्लांट उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा उल्लेख केला आणि जपानी कंपन्यांना भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्र बांधण्यासाठी वेदांतसोबत काम करण्यासाठी आमंत्रित केले.

'या उत्पादन केंद्रात शेकडो लहान आणि मध्यम कंपन्यांना आकर्षित करण्याची क्षमता आहे आणि एक लाखाहून अधिक रोजगाराच्या संधी येथे निर्माण होऊ शकतात. कंपन्यांना या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्रात गुंतवणूक करण्याची ८० अब्ज डॉलरची संधी आहे. भारतात गुंतवणूक करू इच्छिणार्‍या जपानी कंपन्यांसाठी वेदांत हे सुत्रधार म्हणून काम करेल.

अमेरिकेतील मेमरी चिप निर्माता मायक्रोन टेक्नॉलॉजीने गेल्या महिन्यात गुजरातमधील सानंद येथे सेमीकंडक्टर असेंब्ली प्लांट सुरू केला. कंपनीने गुजरातमध्ये सेमीकंडक्टर असेंब्ली आणि चाचणी प्रकल्प उभारण्यासाठी २.७५ अब्ज डॉलर गुंतवणुकीची घोषणा केली आहे. कंपनी दोन टप्प्यांत प्लांट उभारण्यासाठी ८२५ मिलियन डॉलर पर्यंतची गुंतवणूक करेल आणि उर्वरित गुंतवणूक केंद्र आणि राज्य सरकारांकडून येईल.

Web Title: Vedanta's 'super plan' on semiconductors Japan will take over, not Taiwan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.