Lokmat Money > बिझनेस न्यूज > पुन्हा एकदा टेलिकॉम कंपन्या ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याच्या तयारीत, 20 टक्क्यांची वाढ होणार?; पाहा कारण

पुन्हा एकदा टेलिकॉम कंपन्या ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याच्या तयारीत, 20 टक्क्यांची वाढ होणार?; पाहा कारण

टेलिकॉम कंपन्या मोबाईलच्या टॅरिफ प्लॅनमध्ये 15-20% वाढ करू शकतात अशी माहिती आता समोर येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 15:54 IST2022-11-07T15:53:57+5:302022-11-07T15:54:36+5:30

टेलिकॉम कंपन्या मोबाईलच्या टॅरिफ प्लॅनमध्ये 15-20% वाढ करू शकतात अशी माहिती आता समोर येत आहे.

use of mobile will be expensive there will be an increase of 20 percent on postpaid plan know the reason airtel vodafone idea jio | पुन्हा एकदा टेलिकॉम कंपन्या ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याच्या तयारीत, 20 टक्क्यांची वाढ होणार?; पाहा कारण

पुन्हा एकदा टेलिकॉम कंपन्या ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याच्या तयारीत, 20 टक्क्यांची वाढ होणार?; पाहा कारण

5G services may increased the mobile bill: देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी 5G सेवा लाँच केली आहे. मोबाईल नेटवर्कवर 4G नंतर 5G सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या मोबाईल इंटरनेटचा वेग अधिक वाढणार आहे. मात्र स्पीडसोबतच तुमच्या मोबाईलचे बिलही लवकरच वाढणार आहे. टेलिकॉम कंपन्या लवकरच टॅरिफ वाढवू शकतात अशी माहिती समोर येत आहे. 5G लाँच केल्यामुळे, तसेच त्याच्या रोलआउटसाठी निधीची तरतूद केल्यामुळे, कंपन्यांना अतिरिक्त पैशांची आवश्यकता असेल. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांकडून दरात वाढ केली जाऊ शकते, असे मानले जात आहे. पोस्टपेड प्लॅनमध्ये २० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षभरापूर्वी दरवाढ करण्यात आली होती.

यावेळी दर किती वाढू शकतात? दर वाढवण्याची गरज का आहे? टॅरिफ रिव्हिजनची गरज का आहे? याबाबत माहिती देताना CNBC-Awaaz चे असीम मनचंदा म्हणाले की, मोबाईल वापरणे ग्राहकांना महागात पडणार आहे. टेलिकॉम कंपन्या लवकरच दर वाढवू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेलिकॉम कंपन्या पोस्टपेड प्लॅनवर 20 टक्क्यांपर्यंत दर वाढवू शकतात.

20 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते
दुसरीकडे, फिच रेटिंगनुसार, टेलिकॉम कंपन्यांकडून ग्राहकांच्या मोबाईलच्या टॅरिफ प्लॅनमध्ये 15-20 टक्के वाढ होऊ शकते. तर जेएम फायनान्शिअलचे म्हणणे आहे की टेलिकॉम कंपन्या एकाच वेळी दर वाढवणार नाहीत. कंपन्या 2-3 हप्त्यांमध्ये टॅरिफ दर वाढवू शकतात. टॅरिफ वाढवण्याचे कारण 5G सेवा सुरू करण्यासाठी पैसे उभे करणे असल्याचे सांगण्यात येत आहे.

5G रोलआउटसाठी निधी आवश्यक असल्याने टेलिकॉम कंपन्या टॅरिफ वाढवतील अशी अपेक्षा आहे. नवीन सेवेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी कंपन्यांना 5G मध्ये 1.5 ते 2 लाख कोटी रुपये गुंतवावे लागतील, अशी माहिती असीम यांनी दिली. दरम्यान, दूरसंचार कंपनी व्होडाफोन-आयडियाच्या सीईओंनीदेखील सेवांचे दर वाढवण्याबाबत संकेत दिले. गेल्या वेळी नोव्हेंबर 2021 मध्ये दर टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या सेवांचे दर 20 ते 25 टक्क्यांनी वाढवले ​​होते.

Web Title: use of mobile will be expensive there will be an increase of 20 percent on postpaid plan know the reason airtel vodafone idea jio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.