Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमेरिका-भारत व्यापार करारावर टांगती तलवार, युनिफॉर्म टॅरिफचा चीनला फायदा होण्याची शक्यता

अमेरिका-भारत व्यापार करारावर टांगती तलवार, युनिफॉर्म टॅरिफचा चीनला फायदा होण्याची शक्यता

भारताच्या व्यापार करारावर मात्र अजून टांगती तलवार कायम आहे, असे मूडीजने म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 09:17 IST2026-02-25T09:17:06+5:302026-02-25T09:17:51+5:30

भारताच्या व्यापार करारावर मात्र अजून टांगती तलवार कायम आहे, असे मूडीजने म्हटले आहे.

US-India trade deal in limbo, China likely to benefit from uniform tariffs | अमेरिका-भारत व्यापार करारावर टांगती तलवार, युनिफॉर्म टॅरिफचा चीनला फायदा होण्याची शक्यता

अमेरिका-भारत व्यापार करारावर टांगती तलवार, युनिफॉर्म टॅरिफचा चीनला फायदा होण्याची शक्यता

नवी दिल्ली : ट्रम्प यांनी सर्व देशांसाठी लागू केलेल्या १५ टक्के युनिफॉर्म टॅरिफचा चीन आणि आग्नेय आशियाई देशांसह आशिया-प्रशांत क्षेत्रातील काही अर्थव्यवस्थांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मूडीज अॅनालिटिक्सने ही माहिती देण्यात आली आहे. 

भारताच्या व्यापार करारावर मात्र अजून टांगती तलवार कायम आहे, असे मूडीजने म्हटले आहे. चीनसह आग्नेय आशियातील ज्या देशांना यापूर्वी अमेरिकेच्या जाचक आणि अत्यंत उच्च शुल्काचा सामना करावा लागत होता, त्यांच्यासाठी हा निर्णय फायदेशीर ठरू शकतो.

जल्लोष न करता सावध रहा

या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारताला बसण्याची शक्यता आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यान नुकत्याच झालेल्या व्यापार करारांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

रशियन तेलाची खरेदी कमी करण्याबाबतची भारताची कालमर्यादा आणि इंडोनेशियातून होणारी कापड निर्यात यांसारखे महत्त्वाचे मुद्दे अधांतरी आहेत. यामुळेच भारताने नियोजित वॉशिंग्टन दौरा तूर्तास लांबणीवर टाकला.

शुल्कातील कपात ही सवलत वाटत असली, तरी ट्रम्प प्रशासन पुन्हा कायदेशीर मार्ग शोधून शुल्क वाढवू शकते, असा इशाराही मूडीजने दिला आहे. उद्योजकांनी सध्या जल्लोष न करता सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title : अमेरिका-भारत व्यापार समझौता अनिश्चित; समान शुल्क से चीन को लाभ।

Web Summary : ट्रम्प के समान शुल्क से चीन को फायदा हो सकता है, जिससे अमेरिका-भारत व्यापार समझौते पर असर पड़ेगा। भारत को रूसी तेल और इंडोनेशियाई वस्त्रों के संबंध में बाधाओं का सामना करना पड़ रहा है। वाशिंगटन की नियोजित यात्रा स्थगित। विशेषज्ञ संभावित शुल्क वृद्धि की चेतावनी देते हुए सावधानी बरतने की सलाह देते हैं।

Web Title : US-India Trade Deal Uncertain; Uniform Tariffs May Favor China.

Web Summary : Trump's uniform tariffs may benefit China, impacting the US-India trade deal. India faces hurdles regarding Russian oil and Indonesian textiles. A planned Washington visit is postponed. Experts advise caution, warning of potential tariff increases.