Lokmat Money > बिझनेस न्यूज > डिजिटल पेमेंट्समध्ये UPI चा बोलबाला; 2023च्या दुसऱ्या सहामाहीत 100 लाख कोटींचे व्यवहार

डिजिटल पेमेंट्समध्ये UPI चा बोलबाला; 2023च्या दुसऱ्या सहामाहीत 100 लाख कोटींचे व्यवहार

UPI Transactions: भारतासोबतच इतर अनेक देशात UPI ची व्याप्ती वाढत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 03:39 PM2024-04-03T15:39:40+5:302024-04-03T15:40:09+5:30

UPI Transactions: भारतासोबतच इतर अनेक देशात UPI ची व्याप्ती वाढत आहे.

UPI Transactions:UPI Update: UPI dominates digital payments; 100 lakh crore transactions in the second half of 2023 | डिजिटल पेमेंट्समध्ये UPI चा बोलबाला; 2023च्या दुसऱ्या सहामाहीत 100 लाख कोटींचे व्यवहार

डिजिटल पेमेंट्समध्ये UPI चा बोलबाला; 2023च्या दुसऱ्या सहामाहीत 100 लाख कोटींचे व्यवहार

India Digital Payment Report: गेल्या काही वर्षांमध्ये भारतातडिजिटल पेमेंटची व्याप्ती झपाट्याने वाढली आहे. भारताने जगातील अनेक आघाडीच्या देशांनाही मागे टाकलंय. भारतातील डिजिटल पेमेंट सिस्टीममध्ये UPI चा दबदबा सातत्याने वाढतोय. आता फक्त भारतातच नाही, तर अनेक देशांमध्येही UPI चा विस्तार होतोय. एका रिपोर्टनुसार, वर्ष 2023 च्या दुसऱ्या सहामाहीत UPI व्यवहारांमध्ये 56 टक्क्यांची वार्षिक वाढ दिसून आली आहे.

परदेशात UPI ची वाढ
पेमेंट सर्व्हिस क्षेत्रातील ग्लोबल कंपनी वर्ल्डलाइनने 2023 च्या दुसऱ्या सहामाहीसाठी इंडिया डिजिटल पेमेंट रिपोर्ट जारी केली आहे. या रिपोर्टमध्ये भारतातील डिजिटल पेमेंटचा ट्रेंड आणि लँडस्केप टिपण्यात आला. या रिपोर्टनुसार, डिजिटल पेमेंट सिस्टीममध्ये UPI चा सर्वात मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे, UPI फक्त भारतात नाही, तर भारताबाहेरही विस्तारत आहे. 

UPI व्यवहारांमध्ये 44% वाढ
रिपोर्टनुसार, UPI पेमेंटचे प्रमाण 2022 च्या उत्तरार्धात 42.09 अब्ज होते, जे 2023 च्या उत्तरार्धात 65.77 अब्जवर आले. म्हणजेच, वर्षभरात यात 56 टक्के वाढ दिसून आली. जर आपण या पेमेंट्सचे मूल्य पाहिल्यास, 2022 च्या उत्तरार्धात UPI पेमेंट्सचे एकूण मूल्य 69.36 लाख कोटी रुपये होते, जे 2023 च्या उत्तरार्धात 44 टक्क्यांनी वाढून 99.68 लाख कोटी रुपये झाले आहे.

छोट्या पेमेंट्स UPI चा वापर वाढला
इंडिया डिजिटल पेमेंट रिपोर्टनुसार, UPI पेमेंट्सचा सरासरी तिकीट आकार 8 टक्क्यांनी घसरला असून, हा 1648 रुपयांवरुन 1515 रुपयांवर आला आहे. UPI व्यवहारांच्या सरासरी तिकीट आकारात झालेली घट सूचित करते की, लहान पेमेंट्ससाठी UPI चा वापर झपाट्याने वाढत आहे. या रिपोर्टवर वर्ल्डलाइन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश नरसिंहन म्हणाले की, भारताने 2023 मध्ये पेमेंट इकोसिस्टममध्ये एक मोठा टप्पा गाठलाय. 

Web Title: UPI Transactions:UPI Update: UPI dominates digital payments; 100 lakh crore transactions in the second half of 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.