लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: देशात सणासुदीच्या खरेदीचा हंगाम बहरात आला असताना, डिजिटल पेमेंट प्रणाली यूपीआयने व्यवहारांच्या नव्या उंचीला गवसणी घातली आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये यूपीआयद्वारे तब्बल २०.७ अब्ज व्यवहार होत २७.२८ लाख कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल झाली आहे. मूल्याच्या दृष्टीने हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. यापूर्वी मे २०२५ मध्ये २५.१४ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते.
डिजिटल व्यवहारांसाठी यूपीआयच हवे देशातील डिजिटल व्यवहारांपैकी ८५%हिस्सा यूपीआयचा आहे. जगभरात डिजिटल पेमेंट्समध्ये भारताच्या यूपीआयचा वाटा जवळपास ५०% आहे.
