Lokmat Money > बिझनेस न्यूज > उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...

उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...

UPI Payment on Petrol Pump : उद्यापासून पेट्रोल पंपावर UPI पेमेंट करताना अडचणी येऊ शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 14:57 IST2025-05-09T14:54:09+5:302025-05-09T14:57:07+5:30

UPI Payment on Petrol Pump : उद्यापासून पेट्रोल पंपावर UPI पेमेंट करताना अडचणी येऊ शकतात.

UPI Payment on Petrol Pump: UPI payment on petrol pumps in Maharashtra to be stopped from tomorrow; What is the reason? Find out... | उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...

उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...

UPI Payment on Petrol Pump : सामान्य भारतीयांचे जीवन उद्यापासून थोडे बदलू शकते. ज्या UPI आणि डिजिटल पेमेंटमुळे भारतीयांचे जीवन सोपे झाले, त्यामुळे उद्यापासून(10 मे ) त्याला पेट्रोल पंपांवर अडचणीचा सामना करावा लागू शकतो. कारण, पेट्रोल पंप मालकांनी UPI आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवरुन पैसे न स्वीकारण्याची घोषणा केली आहे.

डिजिटल पेमेंटद्वारे वाढत्या सायबर फसवणुकीमुळे देशातील अनेक शहरांमधील पेट्रोल पंप मालकांनी डिजिटल माध्यमातून पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. टीओआयच्या अहवालानुसार, या शहरांमधील पेट्रोल पंप केवळ यूपीआयद्वारे पेमेंट स्वीकारणे थांबवणार नाहीत, तर त्यांनी 10 मे पासून कार्ड पेमेंट स्वीकारणेदेखील बंद करण्याचा इशारा दिला आहे.

कुठे होणार परिणाम?
अलीकडेच विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने म्हटले की, सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे पेट्रोल पंप मालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे त्यांना आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे. फसवणूक करणारे ग्राहकांचे कार्ड किंवा नेट बँकिंग हॅक करतात आणि त्याचा वापर करून पैसे भरतात. मग जेव्हा कोणी या प्रकरणात तक्रार करते, तेव्हा पोलिस व्यवहार रद्द करतात.

अशा सायबर फसवणुकीमुळे अनेक पेट्रोल पंप मालकांचे खाते पूर्णपणे ब्लॉक करण्यात आल्याचे फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे म्हणणे आहे. यामुळे एकीकडे त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे, तर दुसरीकडे उर्वरित रक्कम मिळण्यास त्यांना अडचणी येत आहेत. नाशिकच्या पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशननेही अशीच घोषणा केली आहे. त्यांनाही या संदर्भात अनेक पेट्रोल पंप मालकांकडून तक्रारी आल्या आहेत. 

याबाबत फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता म्हणतात की, सरकारला याबद्दल माहिती देण्यात आली आहे. पेट्रोल पंप मालक आता योग्य कारवाईचे आश्वासन मिळाल्यावरच डिजिटल पेमेंट सुरू करतील. आता महाराष्ट्र पेट्रोल पंप असोसिएशन या निर्णयाची अंमलबजावणी करणार आहे. अशा परिस्थितीत, देशभरात काय प्रतिसाद मिळतो हे पाहणे बाकी आहे.

Web Title: UPI Payment on Petrol Pump: UPI payment on petrol pumps in Maharashtra to be stopped from tomorrow; What is the reason? Find out...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.