Lokmat Money > बिझनेस न्यूज > डिजिटल पेमेंटच्या जगात UPIचा दबदबा! 'यूपीआय'चा वापर कुठे कुठे झाला? वाचा सविस्तर

डिजिटल पेमेंटच्या जगात UPIचा दबदबा! 'यूपीआय'चा वापर कुठे कुठे झाला? वाचा सविस्तर

एप्रिल ते जुलै २०२५ या कालावधीतील यूपीआयच्या पेमेंटमध्ये विक्रमी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 13:30 IST2025-08-21T13:26:08+5:302025-08-21T13:30:05+5:30

एप्रिल ते जुलै २०२५ या कालावधीतील यूपीआयच्या पेमेंटमध्ये विक्रमी वाढ

UPI dominates the world of digital payments Where did you do 'UPI' Read more | डिजिटल पेमेंटच्या जगात UPIचा दबदबा! 'यूपीआय'चा वापर कुठे कुठे झाला? वाचा सविस्तर

डिजिटल पेमेंटच्या जगात UPIचा दबदबा! 'यूपीआय'चा वापर कुठे कुठे झाला? वाचा सविस्तर

डिजिटल पेमेंटच्या जगात यूपीआयने पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध केला आहे. खालील आकडेवारी एप्रिल ते जुलै २०२५ या कालावधीतील यूपीआयच्या विक्रमी वाढीचे आणि वापराचे प्रमुख कल दर्शवते तसेच जुलै महिन्यातील एकूण व्यवहारांची आणि देशभरातील प्रमुख खर्च व वाढीच्या श्रेणींची माहिती दिली आहे.

२०२५ मध्ये यूपीआयवरून सर्वाधिक खर्च?

जुलैमधील व्यवहार

  • १.९अब्ज - महाराष्ट्र
  • १.०६ अब्ज - कर्नाटक
  • १.०३ अब्ज - उत्तर प्रदेश
  • ७७८ दशलक्ष - तामिळनाडू
  • ७९१ दशलक्ष - तेलंगणा


एप्रिल-जुलैमधील व्यवहार

  • ३,५१,४७७.४८ - कर्ज वसुली
  • २,४७,७१०.६१ - ग्रोसरी आणि सुपर मार्केट
  • १,४१,६१२.१० - सर्व्हिस स्टेशन
  • ८५,७५३.२७ - (वीज, पाणी, गॅस)
  • ८०,८०६.२६ - दूरसंचार सेवा


व्याज नाही, बँक खाते सुरू करताना ‘हे’ही घ्या विचारात

बँकेच्या बचत खात्यात मोठी रक्कम ठेवताना फक्त जास्त व्याज दराचा विचार करून चालत नाही. बँकेची निवड करताना तिची आर्थिक स्थिती, सेवा आणि मिळणाऱ्या सुविधांकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

पुढील मुद्द्यांचा विचार करा

  • बँक निवडण्याआधी तिची आर्थिक स्थिती, क्रेडिट रेटिंग आणि नफा तपासा. लक्षात ठेवा, ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना डीआयसीजीसी अंतर्गत विमा संरक्षण मिळते.
  • मोठ्या रकमेवर मिळणारे व्याजदर सामान्य खात्यांपेक्षा वेगळे असतात. सध्या काही लहान बँका मोठ्या रकमेवर ६-७% पर्यंत व्याज देत आहेत, तर मोठ्या बँका ३-४% व्याज देतात.
  • मोठ्या रकमेच्या ग्राहकांसाठी चांगली सेवा आणि वेळेवर मिळणारा सपोर्ट महत्त्वाचा असतो.
  • बँकेची शाखा, कस्टमर केअर आणि रिलेशनशिप मॅनेजरसारख्या सुविधांचा विचार करा. तसेच, पैसे सुरक्षितपणे हाताळण्यासाठी मोबाइल ॲप आणि ऑनलाइन व्यवहारांच्या सुविधाही तपासा.
  • काही बचत खात्यांसोबत मोफत डिमांड ड्राफ्ट, एटीएम शुल्क माफी आणि विम्यासारखे फायदे मिळतात. पण त्यांचे नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचा.
  • काही खात्यांमध्ये किमान शिल्लक रक्कम ठेवणे बंधनकारक असते, अन्यथा मोठा दंड लागतो.
  • बँक निवडताना केवळ जास्त व्याजदराकडे आकर्षित होऊ नका, तर बँकेची सुरक्षा, सेवा आणि इतर सुविधांचा समतोल साधा.

Web Title: UPI dominates the world of digital payments Where did you do 'UPI' Read more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onlineऑनलाइन