Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता पीएफ खात्यात कागदपत्रांशिवाय माहिती करा अपडेट

आता पीएफ खात्यात कागदपत्रांशिवाय माहिती करा अपडेट

कागदपत्रांशिवाय वैयक्तिक तपशीलातील मुख्य माहिती बदलण्याची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 11:59 IST2025-03-10T11:59:09+5:302025-03-10T11:59:41+5:30

कागदपत्रांशिवाय वैयक्तिक तपशीलातील मुख्य माहिती बदलण्याची परवानगी

Update information in PF account without documents | आता पीएफ खात्यात कागदपत्रांशिवाय माहिती करा अपडेट

आता पीएफ खात्यात कागदपत्रांशिवाय माहिती करा अपडेट

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था ईपीएफओने युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) आधारशी लिंक केलेल्या सदस्यांना कागदपत्रांशिवाय वैयक्तिक तपशीलातील मुख्य माहिती बदलण्याची परवानगी दिली आहे.

जर यूएएनची पडताळणी आधारद्वारे केली गेली असेल, तर सदस्य कोणतेही कागदपत्र अपलोड न करता त्याचे नाव, जन्मतारीख, लिंग, राष्ट्रीयत्व, वडिलांचे नाव, वैवाहिक स्थिती, जोडीदाराचे नाव, सदस्य म्हणून येण्याची तारीख आणि सदस्यत्व सोडण्याची तारीख अपडेट करू शकतो. याच्यापूर्वी सदस्यांना आपली प्रोफाईल अपडेट करण्यासाठी नियुक्तांची परवानगी घ्यावी लागत असे. त्यामुळे २७ दिवस उशीर होत असते. मात्र आता नवीन निर्णयामुळे सात कोटी सदस्यांना दिलासा मिळणार आहे.

...तर करा ई-केवायसी 

नवीन तरतुदीनुसार, आता नियोक्त्त्यामार्फत तपशीलात सुधारणा करण्याची विनंती फक्त त्या भागधारकांनाच करावी लागेल ज्यांचे यूएएन दि. १ ऑक्टोबर २०१७ पूर्वी जारी केले गेले आहे. 

ज्या सदस्यांचे यूएएन आधारशी लिंक केलेले नाही ते ईपीएफओ वेबसाइटच्या होम पेजवर उपलब्ध असलेल्या ऑनलाइन सेवेअंतर्गत ई-केवायसी पोर्टल किंवा उमंग अॅपला भेट देऊन ई-केवायसी करू शकतात.

सध्या, सदस्यांच्या वतीने दाखल केलेल्या तक्रारींपैकी सुमारे २७% तक्रारी सदस्यांच्या प्रोफाइल आणि केवायसी समस्यांशी संबंधित आहेत.
 

Web Title: Update information in PF account without documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.