जर तुम्ही स्वतःसाठी 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्रीपेड प्लॅनच्या शोधात असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी असे अनेक प्लॅन्स आणले आहेत ज्याची किंमत 200 रुपयांपेक्षा कमी आहे. तसंच त्यात एका महिन्याच्या वैधतेसह अनेक फायदे उपलब्ध आहेत. याशिवाय या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग, डेटा आणि एसएमएससह इतर फायदेही मिळतात. आज आम्ही तुम्हाला अशाच 3 प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत ज्यात तुम्हाला अनलिमिटेड बेनिफिट्स मिळतील. तसंच यातील एक प्लॅन 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीचाही आहे.
155 रुपयांचा प्लॅन
जिओच्या 155 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता मिळते. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. या प्लॅनमध्ये एकूण 2GB डेटा देण्यात येतो. तथापि, हाय स्पीड डेटा संपल्यानंतर तुम्हाला 64 Kbps च्या वेगाने इंटरनेटचा वापर करता येईल. एसएमएसबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये 1000 एसएमएस उपलब्ध आहेत. इतर फायद्यांप्रमाणे, या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.
359 रुपयांचा प्लॅन
जिओच्या 395 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता मिळते. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. डेटाबद्दल बोलायचे झाले तर या प्लानमध्ये एकूण 6GB डेटा देण्यात आला आहे. तथापि, हाय स्पीड डेटा संपल्यानंतर, तुमचे इंटरनेट थांबणार नाही, कारण त्यानंतर डेटा 64 Kbps च्या वेगाने चालू राहील. एसएमएसबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये 1000 एसएमएस उपलब्ध आहेत. इतर फायद्यांप्रमाणे, या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.
1599 रुपयांचा प्लॅन
Jio च्या 1559 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये एकूण 24GB डेटा देण्यात येतो. या प्लॅनमध्ये 336 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. हाय स्पीड डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64 Kbps पर्यंत कमी होईल. एसएमएसबद्दल सांगायचे झाले तर या प्लॅनमध्ये 3000 एसएमएस देण्यात येत आहेत. तसंच या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.