Jio-Vi Recharge Plans: जर तुम्ही जास्त इंटरनेट वापरत असाल, तर तुमच्यासाठी एक्स्ट्रा डेटा ऑफर करणारे प्लॅन्स सर्वोत्तम ठरतात. हेवी इंटरनेट युजर्सचा डेली डेटा अनेकदा २४ तास पूर्ण होण्याआधीच संपतो. अशा वेळी कोणतीही अतिरिक्त पैसे न घेता एक्स्ट्रा डेटा देणारे प्लॅन्स खूप कामाला येतात. जिओ आणि व्होडाफोन-आयडिया (Vi) आपल्या युजर्ससाठी असेच काही खास प्लॅन्स घेऊन आले आहेत, ज्यामध्ये ३० जीबीपर्यंत एक्स्ट्रा डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.
व्होडाफोन-आयडियाचा १७४९ रुपयांचा प्लॅन
व्होडाफोन-आयडियाचा हा प्लॅन १८० दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये युजर्सना दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. विशेष म्हणजे, कंपनी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ४५ दिवसांसाठी ३० जीबी एक्स्ट्रा डेटा ऑफर करत आहे. ज्या युजर्सकडे ५जी नेटवर्क उपलब्ध आहे, त्यांना अनलिमिटेड ५जी डेटा देखील मिळेल. या प्लॅनमध्ये 'बिंज ऑल नाईट' हा फायदा असून, यात रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा वापरता येतो. तसंच 'वीकेंड डेटा रोलओव्हर' आणि दरमहा २ जीबी 'बॅकअप डेटा' (डेटा डिलाइट्स) देखील दिला जातो. यासोबतच दररोज १०० फ्री एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे.
जिओचा ८९९ रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओचा हा प्लॅन ९० दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये युजर्सना दररोज २ जीबी डेटा दिला जातो. कंपनी या प्लॅनमध्ये ग्राहकांना २० जीबी एक्स्ट्रा डेटा विनामूल्य देत आहे. पात्र युजर्सना अनलिमिटेड ५जी डेटाचा लाभ घेता येईल. या प्लॅनमध्ये दररोज १०० फ्री एसएमएस आणि देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.
जिओचे खास अतिरिक्त फायदे
जिओचा हा प्लॅन 'जिओ स्पेशल ऑफर' अंतर्गत येतो. यामध्ये ग्राहकांना जिओ हॉटस्टारचं मोफत सबस्क्रिप्शन आणि 'जिओ एआय क्लाउड'वर ५० जीबी स्टोरेज मिळतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या प्लॅनमध्ये १८ महिन्यांसाठी 'गूगल जेमिनी प्रो' (Google Gemini Pro) प्लॅनचा ॲक्सेस मिळतो, ज्याची प्रत्यक्ष किंमत ३५,१०० रुपये आहे.
