Lokmat Money > बिझनेस न्यूज > ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड

ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड

S&P Upgrades Rating: जागतिक रेटिंग एजन्सी एस अँड पी नं भारताचं रेटिंग अपग्रेड केलं आहे. पाहा काय म्हटलंय जागतिक एजन्सीनं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 15:58 IST2025-08-14T15:58:46+5:302025-08-14T15:58:46+5:30

S&P Upgrades Rating: जागतिक रेटिंग एजन्सी एस अँड पी नं भारताचं रेटिंग अपग्रेड केलं आहे. पाहा काय म्हटलंय जागतिक एजन्सीनं.

Trump called it a dead economy now America s own agency has upgraded India s rating economy news | ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड

ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड

S&P Upgrades Rating: जागतिक रेटिंग एजन्सी एस अँड पी नं भारताचं रेटिंग अपग्रेड केलं आहे. एस अँड पी नं रेटिंग बीबीबी निगेटिव्ह वरून बीबीबी पर्यंत वाढवलंय आहे. यासोबतच, आउटलुक स्थिर ठेवण्यात आला आहे. हा बदल अशा वेळी झाला आहे जेव्हा अलिकडेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर शुल्क लादलं आहे आणि त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचं डेड इकॉनॉमी असा उल्लेख केला होता.

एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जचे संचालक यीफार्न फुआ म्हणाले की, अमेरिकेच्या ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या वाढीवर परिणाम होणार नाही आणि सॉवरेन रेटिंगचा आउटलुक देखील सकारात्मक राहील. टॅरिफ लादल्याने भारताच्या सकारात्मक आउटलुकवर नकारात्मक परिणाम होईल का असे विचारले असता, यीफार्न म्हणाले, "भारतावर लादलेल्या टॅरिफचा आर्थिक वाढीवर कोणताही परिणाम होईल असं मला वाटत नाही. जीडीपीच्या तुलनेत निर्यातीच्या बाबतीत भारताचा अमेरिकेला असलेला धोका पाहिला तर तो फक्त २ टक्के आहे." एस अँड पीचा अंदाज आहे की चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारताचा जीडीपी विकास दर ६.५ टक्के असेल, जो मागील आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या बरोबरीचा आहे.

बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव

ट्रम्प प्रशासनानं लादलंय टॅरिफ

अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनानं सर्व भारतीय उत्पादनांवरील २५ टक्के शुल्काव्यतिरिक्त रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीचं कारण पुढे करून २५ टक्के अतिरिक्त शुल्क लादलं आहे. अशाप्रकारे, एकूण शुल्क ५० टक्के असेल. हे २७ ऑगस्टपासून लागू होईल. भारतावरील शुल्क जाहीर केल्यानंतर काही तासांतच ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं होतं की भारत आणि रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्थांना एकत्र आणू शकतात आणि त्यांना त्याचा काही फरक पडत नाही. ट्रम्प यांच्या या विधानाचा हवाला देत, भारतातील विरोधक जोरदार आवाज उठवत आहेत.

रेटिंग एजन्सीनं काय म्हटलं?

रेटिंग एजन्सीन म्हटलंय की, गेल्या वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. भाजपनं मागील दोन टर्ममध्ये स्वतंत्रपणे राज्य केलं आहे, परंतु एनडीए सरकार पहिल्यांदाच स्थापन झालं. परंतु भारतीय संसदेच्या कनिष्ठ सभागृहात, लोकसभेत भाजपला जोरदार बहुमत आहे. आर्थिक सुधारणा राबविण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचं ते पाठिंबाही देत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

Web Title: Trump called it a dead economy now America s own agency has upgraded India s rating economy news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.