Mutual Funds Adani Group Stocks: म्युच्युअल फंड अदानी समूहातील कंपन्यांमधील आपला हिस्सा कमी करत आहेत. एप्रिलमध्ये म्युच्युअल फंडांनी अदानी समूहाच्या आठ लिस्टेड कंपन्यांमधील १,१६० कोटी रुपयांहून अधिक रकमेचे शेअर्स विकले. यामुळे एप्रिलमध्ये अदानी समूहाच्या ७ कंपन्यांमधील म्युच्युअल फंडांचे शेअरहोल्डिंग कमी झालं आहे. म्युच्युअल फंड हाऊसेसनं अदानी एंटरप्रायझेसमधील आपला हिस्सा ३४६ कोटी रुपयांनी कमी केला. त्यानंतर फंड मॅनेजर्सनं अदानी एनर्जी सोल्यूशन्स आणि अंबुजा सिमेंटमधील आपला स्टेक अनुक्रमे ३०२ कोटी आणि २४१ कोटी रुपयांनी कमी केला.
या कंपन्यांचे शेअर्स विकले
याशिवाय म्युच्युअल फंड हाऊसेसनं एसीसी (१२४ कोटी रुपये), अदानी पोर्ट्स अँड सेझ (७.७ कोटी रुपये) आणि अदानी टोटल गॅस (३.४३ कोटी रुपये) मधील आपला हिस्सा कमी केला आहे. मात्र, अदानी समूहाचा एकमेव शेअर राहिलाय आणि तो म्हणजे अदानी पॉवरचा. ज्यात म्युच्युअल फंडांनी आपला हिस्सा किंचित वाढवला आणि १०२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. याशिवाय, फंड हाऊसेसनी मार्चमध्ये अदानी समूहाच्या कंपन्यांमधील गुंतवणूक ही कमी केली आहे. अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी एंटरप्रायझेस वगळता समूहातील उर्वरित शेअर्समध्ये निव्वळ विक्री झाली. फेब्रुवारी महिन्यात म्युच्युअल फंडांनी अदानी समूहाच्या आठ कंपन्यांमध्ये सुमारे ३२१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
कशाची आहे चिंता?
बाजार तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार अदानी समूहाच्या या कंपन्यांमध्ये विक्री उच्च मूल्यांकन, रेग्युलेटरी तपास आणि सेक्टर स्पेसिफिट रिस्क आणि गव्हर्नन्स संबंधित चिंतांमुळे पाहायला मिळत आहे. दरम्यान, बाजार तज्ज्ञांनी म्हटलं की म्युच्युअल फंड्सनं अदानी समूहातील आपला हिस्सा प्रामुख्यानं शेअर्समधील हायर व्हॅल्युएशनमुळे केलं. कारण अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांचे शेअर्स आपल्या क्षेत्रातील कंपन्यांच्या तुलनेत अधिक महागडे आहेत.
(टीप - यामध्ये केवळ सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)