Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पोर्टफोलिओ हवाय मजबूत? मग 'या' ५ दिग्गज कंपन्यांवर ठेवा नजर; तज्ज्ञांनी दिली 'बाय' रेटिंग

पोर्टफोलिओ हवाय मजबूत? मग 'या' ५ दिग्गज कंपन्यांवर ठेवा नजर; तज्ज्ञांनी दिली 'बाय' रेटिंग

Top Stokcs : भारतीय शेअर बाजारातील अस्थिरतेच्या काळात पोर्टफोलिओला मजबूती देण्यासाठी मोतीलाल ओसवाल रिसर्च डेस्कने ५ दर्जेदार शेअर्सची निवड केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 11:50 IST2026-03-06T11:49:25+5:302026-03-06T11:50:41+5:30

Top Stokcs : भारतीय शेअर बाजारातील अस्थिरतेच्या काळात पोर्टफोलिओला मजबूती देण्यासाठी मोतीलाल ओसवाल रिसर्च डेस्कने ५ दर्जेदार शेअर्सची निवड केली आहे.

Top 5 Stock Picks by Motilal Oswal Research Astral, TVS Motor, and Apollo Hospitals Among Key Buys | पोर्टफोलिओ हवाय मजबूत? मग 'या' ५ दिग्गज कंपन्यांवर ठेवा नजर; तज्ज्ञांनी दिली 'बाय' रेटिंग

पोर्टफोलिओ हवाय मजबूत? मग 'या' ५ दिग्गज कंपन्यांवर ठेवा नजर; तज्ज्ञांनी दिली 'बाय' रेटिंग

Top Stokcs : भारतीय शेअर बाजारात चढ-उतार सुरू असताना, गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओला बळकटी देण्यासाठी मोतीलाल ओसवाल रिसर्च डेस्कने ५ दर्जेदार शेअर्सची निवड केली आहे. या कंपन्यांच्या कामगिरीचा आढावा घेता, आगामी काळात हे शेअर्स गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देऊ शकतात, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या कंपन्यांचे बिझनेस मॉडेल, ताळेबंद आणि भविष्यातील विकासाचा वेग पाहता, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हे पर्याय 'बॅलन्स्ड' असल्याचे मानले जाते.

१. ॲस्ट्रल - टार्गेट प्राईस २,००० रुपये
पीव्हीसी किमतीतील चढ-उताराचा फटका कंपनीला बसला असला तरी, कंपनीच्या विक्रीतील वाढ कायम आहे. हाय-व्हॅल्यू प्रॉडक्ट्सच्या वाढत्या मागणीमुळे आणि पीव्हीसी किमती स्थिर होत असल्याने, भविष्यात कंपनीच्या नफ्याचे प्रमाण सुधारण्याची दाट शक्यता आहे.

२. किर्लोस्कर ऑइल इंजिन्स - टार्गेट प्राईस १,६०० रुपये
कंपनीने आपला बी२सी (B2C) व्यवसाय उपकंपन्यांकडे सोपवून आता पूर्णपणे बी२बी व्यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे. पॉवर जनरेशन आणि औद्योगिक क्षेत्रात, विशेषतः डेटा सेंटर्स आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांकडून वाढत्या मागणीमुळे कंपनीच्या कमाईत चांगली वाढ दिसून येत आहे.

३. मॅक्स फायनान्शिअल - टार्गेट प्राईस २,२२० रुपये
विमा क्षेत्रात ही कंपनी सातत्याने उद्योग क्षेत्रापेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. सुरक्षा आणि बचत उत्पादनांच्या वाढत्या योगदानामुळे कंपनीच्या नफ्याचे प्रमाण २४.१% पर्यंत पोहोचले आहे, जे गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक संकेत आहेत.

४. टीव्हीएस मोटर - टार्गेट प्राईस ४,४६१ रुपये
गेल्या १० वर्षांत दुचाकी क्षेत्रात सातत्याने मार्केट शेअर मिळवणारी टीव्हीएस ही एकमेव भारतीय कंपनी आहे. मजबूत ब्रँड आणि कार्यक्षम व्यवस्थापनामुळे कंपनीचा परतावा २२% वरून ३६% वर पोहोचला असून, भविष्यातील वाढीसाठी ही कंपनी सज्ज आहे.

५. अपोलो हॉस्पिटल - टार्गेट प्राईस ९,०१५ रुपये
आरोग्य सेवा क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या अपोलो हॉस्पिटलचे भविष्य उज्ज्वल आहे. खाटांची संख्या वाढवणे, डिजिटल फार्मसीचा विस्तार आणि डायग्नोस्टिक्स व्यवसायातील वाढ यामुळे कंपनीचा नफा २२% च्या दराने वाढण्याची शक्यता आहे. हॉस्पिटलमधील कार्यक्षमता वाढल्याने मार्जिनमध्येही चांगली सुधारणा दिसून येत आहे.

वाचा - करदात्यांनो, १५ मार्चची डेडलाईन विसरू नका! ॲडव्हान्स टॅक्स भरला नाही तर बसेल व्याजाचा दंड

गुंतवणूकदारांसाठी टीप : मोतीलाल ओसवाल रिसर्च डेस्कने सुचवलेले हे शेअर्स तांत्रिक आणि मूलभूत अभ्यासावर आधारित आहेत. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते, त्यामुळे गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास करणे किंवा आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे हिताचे ठरेल.
 

Web Title : मजबूत पोर्टफोलियो चाहिए? विशेषज्ञ इन 5 कंपनियों की सलाह देते हैं।

Web Summary : मोतीलाल ओसवाल ने पोर्टफोलियो को मजबूत करने के लिए एस्ट्रल, किर्लोस्कर ऑयल, मैक्स फाइनेंशियल, टीवीएस मोटर और अपोलो हॉस्पिटल का सुझाव दिया है। मजबूत वित्तीय और विकास क्षमता उन्हें संतुलित दीर्घकालिक निवेश बनाती है।

Web Title : Want a Strong Portfolio? Experts Recommend These 5 Companies.

Web Summary : Motilal Oswal suggests Astral, Kirloskar Oil, Max Financial, TVS Motor, and Apollo Hospital for portfolio strength. Strong financials and growth potential make them balanced long-term investments.