Lokmat Money > बिझनेस न्यूज > ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीचे Jio चे हे तीन प्लान्स आहेत बेस्ट; किंमत १००० रुपयांपेक्षाही कमी

८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीचे Jio चे हे तीन प्लान्स आहेत बेस्ट; किंमत १००० रुपयांपेक्षाही कमी

Reliance Jio Plans: जर तुम्हीही जिओ युजर असाल आणि स्वत:साठी दीर्घ वैधता असलेला परवडणारा रिचार्ज प्लान शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:31 IST2025-06-05T12:31:07+5:302025-06-05T12:31:07+5:30

Reliance Jio Plans: जर तुम्हीही जिओ युजर असाल आणि स्वत:साठी दीर्घ वैधता असलेला परवडणारा रिचार्ज प्लान शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे.

three Jio plans with 84 days validity are the best price less than Rs 1000 jio saavan internet calling benefits | ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीचे Jio चे हे तीन प्लान्स आहेत बेस्ट; किंमत १००० रुपयांपेक्षाही कमी

८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीचे Jio चे हे तीन प्लान्स आहेत बेस्ट; किंमत १००० रुपयांपेक्षाही कमी

रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशातील बहुतांश मोबाइल युजर्स जिओशी जोडलेले आहेत. जर तुम्हीही जिओ युजर असाल आणि स्वत:साठी दीर्घ वैधता असलेला परवडणारा रिचार्ज प्लान शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशाच तीन रिचार्ज प्लान्सबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला ८४ दिवसांच्या वैधतेसह खूप चांगले फायदे मिळतील. चला जाणून घेऊया कोणते आहेत हे प्लान्स.

जिओचा ७९९ रुपयांचा प्लान

जिओचा ७९९ रुपयांचा प्लान ८४ दिवसांच्या वैधतेसह येतो. ८४ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. तसंच दररोज १.५ जीबी डेटा आणि १०० फ्री एसएमएसही मिळतात. यासोबतच या प्लानमध्ये जिओ हॉटस्टारचा फ्री अॅक्सेसदेखील समाविष्ट आहे.

SEBI च्या नावावर सुरू आहे फसवणूक, तुम्हालाही नोटिस आली असेल तर 'अशी' करू शकता चेक

जिओचा ८५९ रुपयांचा प्लान

जिओच्या ८५९ रुपयांच्या प्लानची वैधता ही ८४ दिवसांची आहे. ८४ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. तसेच दररोज २ जीबी डेटा आणि १०० फ्री एसएमएसही मिळतात. यासोबतच या प्लानमध्ये जिओ हॉटस्टारचा फ्री अॅक्सेसदेखील समाविष्ट आहे.

जिओचा ८८९ रुपयांचा प्लान

जिओच्या ८८९ रुपयांच्या प्लानची वैधता ही ८४ दिवसांची आहे. ८४ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. तसेच दररोज १.५ जीबी डेटा आणि १०० फ्री एसएमएसही मिळतात. यासोबतच या प्लानमध्ये जिओ हॉटस्टारचा फ्री अॅक्सेसदेखील समाविष्ट आहे. त्याचबरोबर या प्लॅनमध्ये युजर्संना जिओ सावनचा फ्री अॅक्सेसही मिळतो.

Web Title: three Jio plans with 84 days validity are the best price less than Rs 1000 jio saavan internet calling benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.