Reliance Jio Recharge Plans : रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशातील कोट्यवधी मोबाइल युजर्स जिओशी जोडलेले आहेत. जिओनं आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारचे रिचार्ज प्लान आणलेत. महागडे ते स्वस्तापर्यंत असे जिओकडे सर्व प्रकारचे प्लान्स आहेत. जर तुम्ही ओटीटी प्रेमी असाल आणि स्वस्त रिचार्ज प्लॅनच्या शोधात असाल ज्यात तुम्हाला फ्री ओटीटी सब्सक्रिप्शन तसंच डेली अनलिमिटेड बेनिफिट्स मिळतील तर तुम्ही जिओचा १७९९ रुपयांचा प्लान खरेदी करू शकता.
जिओचा १७९९ रुपयांचा रिचार्ज प्लान त्यांच्यासाठी उत्तम आहे ज्यांना जास्त डेटा आणि अनलिमिटेड बेनिफिट्स तसंच फ्री ओटीटी सब्सक्रिप्शन हवं आहे. जाणून घेऊया जिओच्या १७९९ रुपयांच्या रिचार्ज प्लानबद्दल अधिक माहिती.
जिओचा १७९९ रुपयांचा प्लान
जिओचा १७९९ रुपयांचा प्लान ८४ दिवसांच्या वैधतेसह येतो. ८४ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये युजर्स अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा घेऊ शकतात. डेटाबद्दल बोलायचं झालं तर युजर्सना प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटाचा फायदा मिळतो. डेली डेटा लिमिट संपल्यानंतर युजर्स ६४ केबीपीएसच्या स्पीडनं डेटा वापरू शकतात. त्याचबरोबर पात्र युजर्स अनलिमिटेड ५जी चादेखील लाभ घेऊ शकतात. प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस मिळतात.
नेटफ्लिक्सचाही समावेश
जिओच्या या प्लानमध्ये युजर्सला लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सचे फ्री बेसिक सब्सक्रिप्शन मिळते. याशिवाय जिओ सिनेमा, जिओ क्लाऊड आणि जिओ टीव्हीचा फ्री अॅक्सेसदेखील या प्लानमध्ये मिळतो.